Maval News : कान्हेतील शासकीय ग्रामीण रुग्णालयात पुन्हा 30 बेडचे कोविड रुग्णालय सुरु

एमपीसी न्यूज – कान्हे येथील शासकीय ग्रामीण रुग्णालयात गुरुवारी (दि.15) पुन्हा 30 बेडचे कोविड रुग्णालयात सुरु केले असुन सद्यस्थितीत 25 कोविड रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णांना सर्व मोफत दर्जेदार औषधोपचार मिळत असुन आतापर्यंत एकही मृत्यू झालेला नाही.

मावळात कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत असल्याने सर्वसामान्य गरीब व गरजूंना औषधोपचार मिळण्यासाठी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली ऑक्सिजन युक्त 30 बेड असलेले कोविड रुग्णालयात सुरु केले.

यात वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शशांक धंगेकर व डॉ किरण माने आदी कार्यरत आहेत.

_MPC_DIR_MPU_II

दोन व्हेंटिलेटर बेड असुन रुग्णालयात मोफत rat रॅपिड अँटिजेन टेस्ट व आरटी-पीसीआर) टेस्ट केली जाते. (आर टी – पी सी आर) साठी आधार कार्ड आवश्यक आहे. कोविड रुग्ण विभागासाठी 3 वैद्यकीय अधिकारी व 7 नर्स कार्यरत असुन आणखी एक वैद्यकीय अधिकारी व 4 नर्स नव्याने नियुक्त करण्यात येणार आहेत.

कोरोना रुग्णांना सकाळी चहा व नाष्टा तसेच दुपारी व सायंकाळी जेवण हे सर्व मोफत दिले जाते.

गरजू रुग्णांना रेमडीसीविर मोफत दिले जात आहे. आतापर्यंत एकही रुग्णांचा मृत्यू कोरोनाने झाला नसुन पूर्णपणे मोफत औषधोपचार दिले जात आहे.

सद्यस्थितीत एकूण 25 कोरोना रुग्ण असून 1 व्हेंटिलेटरवर, 7 ऑक्सिजन वर व 17 रुग्ण औषधोपचार घेत आहेत, अशी माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. जयश्री ढवळे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.