Maval News : 5 हजार नागरिकांचे लसीकरण करणार – नगरसेवक संतोष भेगडे यांचा संकल्प

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे नगरसेवक व महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष संतोष छबुराव भेगडे यांच्या वाढदिवसानिमित्त कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर फ्लेक्स, जाहिरात, जाहिर समारंभ अशा अनावश्यक गोष्टींना फाटा देत मावळ तालुक्याच्या ग्रामीण भागात सामाजिक उपक्रम राबवण्यात आला.

युवा नेते संतोष भेगडे यांच्या वतीने येळसे प्राथमिक आरोग्य केंद्र, पवननगर प्राथमिक आरोग्य केंद्र, पवनानगर पोलीस मदत केंद्र, तसेच पवनानगर बाजारपेठेत दुकानदारांना, भाजीपाला विक्रेते व हमाल यांना सुमारे 2 हजार N-95 मास्क चे वाटप करण्यात आले.

सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा उद्रेक पाहायला मिळत असून दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्येत विक्रमी वाढ होत आहे. यावेळी कोरोनाला अटकाव करण्यासाठी व या महाभयानक विषाणूपासून स्वतःला वाचवण्यासाठी सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले.

यावेळी माजी सरपंच चंद्रकांत दहिभाते, माजी चेअरमन नामदेव ठुले, माजी सरपंच लालाजी गोणते, मावळ तालुका राष्ट्रवादी चे उपाध्यक्ष पांडुरंग शिर्के, सरचिटणीस संजय मोहोळ, रोहिदास घोजगे, व्यापारी सेलचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब छाजेड, बोहरा शेठ, राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते, चंद्रकांत दादा युवामंच चे कार्यकर्ते व नगरसेवक संतोषभाऊ भेगडे मित्र परिवार उपस्थित होता.

मागील वर्षी प्रमाणे सलग दुसऱ्या वर्षीही मोठा वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून वाढदिवस साजरा न करता सामाजिक भान राखून त्या पार्श्वभूमीवर या उपक्रमाचे आयोजन केले होते व या उपक्रमाचे अनुकरण इतरांनी करावे असे आवाहनही संतोष भेगडे यांनी केले. नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी. मास्क, सॅनिटायझरचा वापर करावा.

आपल्यापासून इतरांना धोका होणार नाही याची दक्षता घ्यावी. मागील 14 महिन्यांपासून आपले तळेगाव शहर व मावळ तालुक्यात वाढलेला कोरोना व त्या पार्श्वभूमीवर झालेली कामगारांची पिळवणूक लक्षात घेऊन हातावर पोट भरणाऱ्या तसेच आर्थिक बाजू कमकुवत असलेल्या नागरिकांसाठी नगरसेवक संतोष भेगडे यांच्या वतीने मोफत अन्नदान, अन्नधान्याचे वाटप, मास्क वाटप, आरोग्य तपासणी, औषध वाटप, आरोग्य किट वाटप असे अनेक उपक्रम राबवले गेले.

त्याचा हजारोंच्या संख्येने नागरिकांनी लाभ घेतला. आजही कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर लसीकरण मोहीम हाती घेतली असून त्याद्वारे अनेकांना लाभ मिळत आहे. वाढदिवसाचे निमित्त साधून नगरसेवक संतोष भेगडे यांनी 5 हजार नागरिकांना लसीकरण करून देण्याचा संकल्प केला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.