Maval Corona Update : तालुक्यात दिवसभरात 60 जणांना डिस्चार्ज तर 87 नवे रुग्ण

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यात रविवारी (दि. 1) 87 रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला, तर तालुक्यात दिवसभरात 60 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

आज एकाही रुग्णाचा कोरोनाने मृत्यू झाला नाही, आतापर्यंत 516 रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. सद्यस्थितीत उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 476 आहे.

शहरी भागात 10 तर ग्रामीण भागात 77 रुग्ण आज सापडले. आज तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या हद्दीत 9 रुग्ण सापडले. लोणावळा नगरपरिषदेच्या हद्दीत 1 रुग्ण सापडला. वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीत आज एकही रुग्ण सापडला नाही.

तालुक्यातील कोरोनाबाधितांची आतापर्यंतची एकूण संख्या 25,997 झाली आहे. तर दिवसभरात 60 रुग्ण बरे झाल्याने घरी सोडण्यात आले. रविवारी आढळलेल्या कोरोना रुग्णांमध्ये ग्रामीण भागात भाजे 40, उर्से 6, कार्ला 6, पवळेवाडी 5, मुंढावरे 3, धामणे, सोमाटणे, वराळे, इंदोरी, तळेगाव दाभाडे ग्रामीण प्रत्येकी 2, वाकसाई, साते, कामशेत, माऊ, चिखलसे, जवन व महागाव येथे प्रत्येकी 1 असे एकूण 77 रुग्ण सापडले.

25,005 जणांना आतापर्यंत डिस्चार्ज देण्यात आला आहे. आतापर्यंत 516 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तळेगाव नगरपरिषद हद्दीत सर्वाधिक 8,196,लोणावळा नगरपरिषद हद्दीत 4,323 व वडगाव नगरपंचायत हद्दीत 1296 रुग्ण सापडले आहेत. शहरी भागात 13,815 रुग्ण तर ग्रामीण भागात 12,182 रुग्ण आढळून आले आहेत. 1 रुग्णाची परिस्थिती गंभीर आहे.

कोरोना रुग्ण बरे होण्याचा दर 96.18 टक्के आहे तर मृत्यू दर 1.83 टक्के आहे. सद्यस्थिती तळेगाव दाभाडे नगरपरिषद मध्ये 106 लोणावळा नगरपरिषद मध्ये 44 वडगाव नगरपंचायत मध्ये 12 व ग्रामीण भागात 314 असे एकूण 476 रुग्ण आहेत. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे व कोविड समन्वयक डॉ. गुणेश बागडे यांनी माहिती दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.