maval News : मावळात 49 ग्रामपंचायतीसाठी 81.76 टक्के मतदान; सोमवारी होणार मतमोजणी

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्यातील 49  ग्रामपंचायतीसाठी एकूण 150 मतदान केंद्रावर  81.76  टक्के मतदान झाले आहे. सर्वाधिक मतदान बऊर ग्रामपंचायत 93.34 टक्के तर सर्वात कमी 55.93 टक्के माळवाडी ग्रामपंचायती मध्ये झाले आहे. एकूण 1167  अधिकारी व कर्मचारी मतदान प्रक्रियेसाठी नियुक्ती होते.

दरम्यान, सोमवारी (दि.18) सकाळी 10  वा. तळेगाव दाभाडे येथील पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये मतमोजणी होणार असल्याची माहिती निवडणूक नियंत्रण अधिकारी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, संतोष सोनवणे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील 49 ग्रामपंचायतीच्या 316  सदस्यांसाठी आज शांततेत मतदान झाले. मावळ तालुक्यातील एकूण 150  मतदान केंद्रावर मतदान सकाळी 7.30 वाजता सुरू झाले. या 316 जागांसाठी 711 उमेदवारांना मतदान झाले.

एकूण 82,519 एकूण मतदारांपैकी 67,464 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यात 42, 732 पुरुष मतदारांपैकी 35,413 तर 39,786 महिला मतदारांपैकी 32,051 मतदारांनी मतदान केले.

_MPC_DIR_MPU_II

ग्रामपंचायत व मतदान टक्केवारी पुढीलप्रमाणे

माळेगाव बुद्रुक – 74.03, इंगळुन – 71.45, खांड -88.97, डाहुली – 86.77, कशाळ – 84. 07, वडेश्वर – 76.00, कुसवली – 80.70, परंदवडी- 85.15, उर्से -86.13, धामणे -85.40, गहूंजे – 83.05, सांगावडे – 91.61, आंबी- 85.42, माळवाडी -55.93, करंजगाव -85.85, गोवित्री – 84.89, साई – 85.49, घोणशेत- 87.00, चिखलसे -92.80, खडकाळा – 71.27, कुसगाव खुर्द – 83.07, टाकवे बुद्रुक – 86.20, साते -86.71, नाणे – 87.26, कांब्रे नामा 89.42, वेहरगाव – 74.75, ताजे – 92.42, मळवली – 80.68, पाटण- 89.59, कार्ला- 82.62, खांडशी- 88.83, उकसान- 89.81, शिरदे -82.10, तिकोणा -87.50, कोथुर्णे -63.69, वारू -89.85, मळवंडी ठुले -80.26, आपटी -81.16, अजीवली- 88.48, मोरवे -80.32, महागाव- 88.38, कुसगाव बुद्रुक- 73.84, कुरवंडे -74.58, शिवली- 86.22, येळसे -88.92, बऊर- 93.34, थुगाव- 89.90 , शिवणे -88.47, आढले खुर्द -92.54

सायंकाळी तळेगाव दाभाडे येथील पै.विश्वनाथराव भेगडे क्रीडा संकुलमध्ये मतदान यंत्र व साहित्य जमा करण्यात आले.

मावळ तालुक्यातील ग्रामपंचायती अस्तित्वास आल्यापासून आजपर्यंतच्या प्रत्येक निवडणुकीतील मतमोजणी प्रथमच तळेगाव दाभाडे येथे होत आहे. यामुळे प्रथमच ग्रामीण भागातील निकालाचा जल्लोष तळेगावकरांना अनुभवायला मिळेल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

You might also like