Maval News : अ‍ॅड. बबनराव गोविंदराव म्हाळसकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील श्री पोटोबा महाराज देवस्थानचे माजी विश्वस्त सल्लागार, अ‍ॅड. बबनराव गोविंदराव म्हाळसकर (वय 66) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले.

त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, मुलगी, भाऊ, नातवंडे असा परिवार आहे. युवा उद्योजक महेंद्र व हर्षल म्हाळसकर यांचे ते वडील होत तर मावळ पंचायत समितीचे माजी सभापती व विद्यमान सदस्य गुलाबराव म्हाळसकर यांचे ते ज्येष्ठ बंधू होत.

अंत्यविधी वैकुंठ स्मशानभूमी वडगाव मावळ या ठिकाणी झाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.