Maval News : नायब तहसीलदारपदी प्रसन्न केदारी यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – मावळ तहसील कार्यालयाच्या महसूल नायब तहसीलदारपदी प्रसन्न पुनाजी केदारी यांची नियुक्ती झाली. त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला. दीड वर्षाच्या प्रतीक्षेनंतर महसूल नायब तहसीलदार यांची नियुक्ती झाली.

महसूल नायब तहसीलदार समीर यादव यांची सप्टेंबर 2019 मध्ये बदली झाली. तेव्हापासून हे पद रिक्त होते. वडगाव रासाई तालुका शिरूर येथील मंडलाधिकारी पदावरून पदोन्नतीने मावळ महसूल नायब तहसीलदारपदी नियुक्ती झाली.

शिधा पुरवठा, महसूल विषयक कामे व 7/12 संगणकीकृत कामे येतात. प्रसन्न केदारी यांच्या नियुक्तीबद्दल मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, निवासी नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष सोनवणे, संजय गांधी योजना नायब तहसीलदार नंदकुमार धनगर, मंडलाधिकारी बजरंग मेकाले, अजय सोनवणे, संदीप बोरकर कर्मचारी उत्तम लोंढे, संदीप माळोदे, अजय लिमये आदींनी स्वागत करून सत्कार केला.

नागरिकांना रेशनकार्ड व रेशन वितरण बाबत पुढाकार घेणार व महसूलची कामे प्राधान्याने करणार असे केदारी यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.