Maval News : वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विलास भोसले यांची नियुक्ती

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकपदी विलास श्यामराव भोसले यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यांचा पदभार आज स्वीकारला आहे.

पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांची बदली सोलापूर ग्रामीण येथे झाल्याने त्या रिक्त जागेवर पुणे ग्रामीण आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांची नियुक्ती पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी केली.

मावळ तालुक्याचे मुख्यालय असलेल्या वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत कायदा व सुव्यवस्था, गुन्ह्याचा तात्काळ तपास तसेच 100 टक्के अवैध धंदे बंद ठेवण्यात येणार असल्याचे पोलीस निरीक्षक भोसले यांनी सांगितले.

त्यांच्या नियुक्तीबद्दल हॉटेल शिवराजचे मालक अतुल वायकर, मोहित कदम, मनोज कदम व गणेश तावरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी पोलीस उप निरीक्षक दिलीप देसाई, विजय वडोदे, संतोष चामे, शीला खोत, कर्मचारी गणेश तावरे, मनोज कदम, अमोल कसबेकर, श्रीशेल कंटोळी, दिलीप सुपे, प्रवीण विरणक, अंकुश पाटील संतोष माने बहुसंख्येने कर्मचारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.