Maval News : मध्य आशियातील ‘पट्टकदंब’चे मावळात आगमन; तालुक्यातील पक्षी वैभवात भर

एमपीसीन्यूज : मावळ परिसरात हिवाळ्याची चाहूल लागताच स्थलांतरीत पक्षींचा वावर दिसून येऊ लागला आहे. सध्या तालुक्यात ‘पट्टकदंब’चे आगमन झाले आहे. तालुक्यातील यामुळे पक्षीमित्र व पक्षी अभ्यासकांमध्ये आनंदी वातावरण निर्मिती झाले आहे. वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांनी ही माहिती दिली.

हिवाळ्याची चाहूल लागताच पक्षीप्रेमी, अभ्यासक व तज्ञ मंडळी वाट पहात असतात ती पक्षी स्थलांतराची. जस जसा हिवाळा वाढत जातो, तसं तसे पक्षी स्थलांतर चालू होते. यातले काही पक्षी स्थलांतर करून भारतात पण येतात. यात काही दुर्मीळ पक्षांचे पण दर्शन होते.

या वर्षी मावळ तालुक्यात काही भागात पट्टकदंब ( Bar Headed Goose ) या जातीचे पक्षी आढळून आले आहेत. हे पक्षी आशिया खंडातील मध्यवर्ती भागातून स्थलांतर करुन भारतात येतात. स्थलांतर प्रवासादरम्यान हे पक्षी हिमालय पर्वतरांगा ओलांडून भारतात येतात.

_MPC_DIR_MPU_II

समुद्रसपाटी पासून सर्वांत उंच उडण्यारा पक्षी म्हणून याची ओळख आहे. पट्टकदंब हा पक्षी आकाराने साधारणपणे 71 ते 76 सेमी इतका असतो.

भारतात सुमारे 159  प्रजातींचे पक्षी स्थलांतर करून येतात. त्यामधे थापट्या, नकटा, शेंडीबदक, लालसरी, थोरले व धाकटे मराल, तरंग, गडवाल, चक्रवाक ही बदके तसेच कादंब व पट्टकादंब हे गूज येतात.

चमचा, अवाक, तुतवार, शेकाट्या, कारंडव, उचाट, सोनचिलखा, कुरव असे पाणथळीचे पक्षीही येतात. तसेच गप्पीदास, कस्तुर, शंकर, धोबी, क्रौंच या पक्ष्यांबरोबरच दलदल ससाणा, शिक्रा, कवड्या हारिण, तीसा, श्येन कुकरी, खरुची हे शिकारी पक्षीही येतात.

यातले अमुर ससाणा Amur Falcon , Lesser Kestrel खरुची, Common Kestrel, Marsh Harrier, Eurasian Sparrow Hawk हे शिकारी पक्षी देखील दिसून येत आहेत, अशी माहिती वन्यजीव छायाचित्रकार अभय तुळशीराम केवट यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.