Maval News: इंदोरीत कोरोना गुढी महोत्सवाद्वारे जनजागृती

एमपीसी न्यूज – कोविड 19 प्रतिबंधात्मक उपाययोजनांअंतर्गत ‘माझा परिवार माझी जबाबदारी’च्या अनुषंगाने पुणे जिल्हा परिषद एकात्मिक बालविकास सेवा योजना मावळ व इंदोरी ग्रामपंचायतीच्या वतीने जनजागृतीसाठी कोरोना गुढी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

_MPC_DIR_MPU_II

जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे व पंचायत समिती सदस्या ज्योती शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत व उपसरपंच नितीन ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम पार पडला.

वाढते कोरोना रुग्ण व वाढत्या मृत्यू प्रमाणास रोखण्याचे उद्देशाने जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन केले. पर्यवेक्षिका सुधा देसले यांच्या मार्गदर्शनाखाली राजश्री राऊत, मंगल नरवडे, रंजना शिंदे, रंजना हुलावळे, शबाना सय्यद यांनी कोरोनाविषयी विविध रांगोळ्या काढल्या व म्हणी रेखाटून जनजागृती केली.

यावेळी जागतिक कन्या दिनानिमित्त किशोरी कन्या शाईजा इनामदार हिने बेटी बचाव बेटी पढाव याबाबत तर शेफाली दवे यांनी कोरोना रोखण्याचे संदर्भात मार्गदर्शन केले.

जागतिक कन्यादिनानिमित्त नितीन मराठे यांनी किशोरी कन्यांचे स्वागत केले. तर गुढीचे स्वागत नितीन ढोरे यांनी केले. कार्यक्रमास वराळ्याचे सरपंच निलेश शिंदे, योगेश मराठे, बाळकृष्ण पानसरे, उर्मिला चव्हाण, मनीषा थोरात, सुवर्णा शिंदे, वैशाली जारकड व किशोरी कन्या उपस्थित होत्या.

प्रास्ताविक व स्वागत सुधा देसले यांनी केले तर आभार बाळकृष्ण पानसरे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.