Maval News : किसान काँग्रेस कमिटीच्या मावळ तालुकाध्यक्षपदी भरत दळवी

एमपीसी न्यूज – अखिल भारतीय काँग्रेस कमिटी, किसान काँग्रेस कमिटीच्या मावळ तालुका अध्यक्षपदी कोथुर्णे येथील भरत तात्याराम दळवी यांची नियुक्ती करण्यात आली. याबाबतचे नियुक्तीपत्र पुणे जिल्हा किसान काँग्रेसचे अध्यक्ष चंद्रकांत सोपान गोरे यांनी दळवी यांना दिले.

यावेळी मावळ तालुका काँग्रेस अध्यक्ष बाळासाहेब ढोरे, बंडू ठेंबे, जालिंदर ताजणे, दत्तात्रय ठाकर, अनिल कुंभार, माऊली सोनवणे, नामदेव दळवी, उमेश थिटे आदी उपस्थित होते.

दळवी यांनी याआधी पवनमावळ काँग्रेस आयचे उपाध्यक्ष म्हणून यशस्वीपणे कार्यभार सांभाळलेला आहे. काँग्रेस विचारसरणीचे निष्ठावान म्हणून ते सुपरिचित आहेत. त्यांच्या निवडीने तालुक्यात अभिनंदन व कौतुक होत आहे.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.