Maval News : आंदर मावळातील नळ पाणीपुरवठा कामांचे भूमिपूजन

एमपीसी न्यूज – आंदर मावळातील (Maval News) माळेगाव खुर्द, माळेगाव बुद्रुक, तळपेवाडी, पिंपरी येथील नळ पाणीपुरवठा योजनेचा भूमिपूजन समारंभ रविवारी (दि.27) महिला भगिनींच्या हस्ते संपन्न झाला. या योजनेसाठी आमदार सुनिल शेळके यांच्या पाठपुराव्याने एकूण 4 कोटी 1 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. यातून या गावांमध्ये पाणी पुरवठ्याची विविध कामे केली जाणार आहेत.

यावेळी माजी जि.प.सदस्या शोभा कदम, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तालुकाध्यक्ष दिपाली गराडे, कुलस्वामिनी महिला मंच अध्यक्षा सारिका शेळके, संगिता शेळके, माजी सभापती शंकरराव सुपे, लक्ष्मण ठाकर, दत्तात्रय पडवळ, सरपंच साधना काठे, उपसरपंच अंकिता गायकवाड, सदस्य बाळासाहेब खंडागळे, शंकर बोऱ्हाडे, रोहिणी कोकाटे, कुंदा बोऱ्हाडे, ग्रामसेवक राहुल देशमाने, राजेश कोकाटे, मारुती करवंदे, सरपंच इंगळुण सुदाम सुपे, भरत जोरी, कल्पेश मराठे, सुनिल ताते, अंकुश ठाकर,बाबासाहेब घाडगे, कमल कोकाटे, अरुण मोरमारे, दशरथ दगडे, यमाजी बोऱ्हाडे, चिंधु बोऱ्हाडे, सविता बोऱ्हाडे, शशिकला सातकर, आदिका तनपुरे, अनिता आंद्रे आदी उपस्थित होते.

जल जीवन मिशन अंतर्गत माळेगाव खुर्द नळ पाणीपुरवठा योजनेसाठी 1 कोटी 5 लक्ष, पिंपरीसाठी 1 कोटी 41 लक्ष, माळेगाव बु.-तळपेवाडीसाठी 1 कोटी 55 लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे.

असे होणार योजनेचे काम – Maval News

• माळेगाव खुर्द येथे पंचवीस हजार लिटर क्षमतेची पाण्याची टाकी
व साडेतीन किलोमीटर पाईपलाईन.
•पिंपरी येथे एकोणतीस हजार लिटर क्षमतेची टाकी व सहा कि.मी पाईपलाईन
•माळेगाव बु.-तळपेवाडी येथे आठ किमी पाईपलाईन करण्यात येणार आहे.प्रत्येक घरापर्यंत नळाद्वारे पाणी पोहचविण्यात येणार आहे.तसेच प्रत्येक ठिकाणी फिल्टर प्लांट उभारण्यात येणार आहे.

आंदर मावळातील दुर्गम भागात असणारी ही गावे आहेत. येथील नागरिकांना पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळत नव्हते. या समस्येची दखल घेत आमदार सुनिल शेळके यांनी सातत्याने पाठपुरावा करुन या गावांतील नागरिकांसाठी नळ पाणी पुरवठा योजना मंजूर केली आहे. या योजनेमुळे येथील प्रत्येक घरापर्यंत शुद्ध पिण्याचे पाणी पोहचणार असल्यामुळे ग्रामस्थांनी आमदार सुनिल शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.