Maval News : जैव इंधन देणार मावळातील शेतकऱ्यांना नवसंजीवनी, मिळवा दरमहा हजारोंचे उत्पन्न!

एमपीसी न्यूज – इंधन दरवाढ, इंधन टंचाई या बाबी भविष्यात अत्यंत मारक ठरतील. त्यामुळे जैव इंधन ही काळाची गरज आहे. पुढील पिढीला आरोग्यदायी, स्वच्छ वातावरण द्यायचे असेल तर जैव इंधन आणि पर्यावरण स्नेही होण्यावाचून दुसरा पर्याय नाही. जागतिक जैव इंधन दिनाच्या (10 ऑगस्ट) निमित्ताने जैव इंधनाची गरज आणि भविष्यातील संधी याबाबत जाणून घेणं आवश्यक आहे.

जैव इंधनाची गरज लक्षात घेत भारताला इंधनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण बनविण्यासाठी मीरा क्लीन फ्युएल लिमिटेड (एमसीएल) कंपनीने भारत सरकारच्या माध्यमातून पुढाकार घेतला आहे. सध्या देशभरातील सुमारे 500 तालुक्यांमध्ये एमसीएल कंपनीने जैव इंधन प्रकल्प राबवले आहेत. तर ही संख्या आगामी काळात साडेसात हजार एवढी केली जाणार आहे.

एमसीएल कंपनी जैव इंधनासोबत सेंद्रिय शेती, सेंद्रिय कोंबडी, बकरी, मच्छी पालन यासह अनेक सेंद्रिय उत्पादने तयार करत आहे. सेंद्रिय उत्पादने तयार करण्यासाठी शेतकऱ्यांचा सहभाग महत्वपूर्ण ठरतो. त्यामुळे एमसीएलने तालुकास्तरावर जैव इंधन आणि इतर सेंद्रिय उत्पादनांचे निर्मिती प्रकल्प सुरू केले आहेत.

बायो सीएनजी हे वाहतूक व औद्योगिक क्षेत्रातील पेट्रोल, डिझेल या खनिज इंधनांना 100 टक्के पर्याय असून कोणत्याही वाहनात वापरणे शक्य आहे.

ज्ञान सरस्वती प्रोड्युसर कंपनी काय काम करणार?

मावळ तालुक्यातील आडे गावात एमसीएल संचलित ज्ञान सरस्वती प्रोड्युसर कंपनी प्रा ली या कंपनीच्या माध्यमातून बायो सीएनजी प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. या प्रकल्पात दररोज 100 टन सीएनजी तसेच 150 टन सेंद्रिय खत तयार केले जाणार आहे.

मिळवा दरमहा प्रतिएकरी 10 ते 15 हजारांचे उत्पन्न

ज्ञान सरस्वती प्रोड्युसर कंपनी मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांकडून हत्ती गवत करार पद्धतीने खरेदी करणार आहे. यातून शेतकऱ्यांना महिन्याला सुमारे 10 ते 15 हजार रुपये प्रति एकर मिळतील.

ज्ञान सरस्वती प्रोड्युसर कंपनी शेतकाऱ्यांसोबत करार करेल. त्यानुसार शेतकऱ्यांना बियाणे, खत कंपनी पुरवणार. गवत कापणीसाठी आल्यानंतर कंपनी ठरलेल्या दरानुसार गवत खरेदी करणार. शेतकऱ्यांना केवळ त्याची मशागत आणि राखण करायची आहे.

गुंतवणूक आणि कागदपत्रे

या करार योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांना 500 रुपये गुंतवणूक करावी लागेल. त्यातील 250 रुपये ही एमसीएल कंपनीच्या शेअरची रक्कम असेल तर उर्वरित पैसे हे फी म्हणून आकारले जातील. यासाठी केवळ आधारकार्ड अथवा पॅनकार्ड आणि पासपोर्ट साईज एक फोटो एवढीच कागदपत्रे आवश्यक आहेत.

शेतकऱ्यांना होणार फायदाच फायदा

कंपनी तालुक्यातील महत्वाच्या ठिकाणी सीएनजी आणि बायो डिझेल पंप सुरू करणार आहे. त्यामुळे सभासद शेतकऱ्यांनी फ्युएल कार्डचा वापर केल्यास त्यांना फायदा होईल. दररोज होणाऱ्या इंधन दरवाढीसाठी सीएनजी हा उत्तम पर्याय असून भविष्यात सीएनजीला मागणी वाढणार आहे. कंपनी तालुक्यातील योग्य ठिकाणी मल्टी ब्रँड सीएनजी कार शोरूम सुरू करणार आहे. सभासद शेतकऱ्यांकडून सुरुवातीला शेअरची किंमत घेतली जात आहे. कारण भविष्यात सीएनजीला प्रचंड मागणी असेल त्यामुळे कंपनीच्या शेअर्सच्या किंमती खूप वाढतील, याचा सभासद शेतकऱ्यांना मोठा फायदा होईल. बायो पीएनजी हे एलपीजी सिलेंडरला पर्याय असून ते घरगुती व व्यावसायिक ठिकाणीही वापरता येणार आहे. कंपनी आंतरराष्ट्रीय दर्जाचे सेंद्रिय खत निर्माण करणार असून त्याच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता वाढेल तसेच त्याचा परिणाम शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढीवर होईल. खत, गॅस खरेदीमध्ये देखील सभासद शेतकऱ्यांना सवलत मिळणार आहे. तर इतरांना ही उत्पादने रास्त दरात मिळणार आहेत.

सहभागी होण्यासाठी लगेच संपर्क करा –
एमपीओ श्रीकांत कंधारे (8698622355)
मुख्य कार्यकारी अधिकारी संगीता एस कंधारे
संचालक रवींद्र पंढरीनाथ काळोखे
आरती (8788047924)

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.