Maval News : राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर

0

एमपीसी न्यूज – वडगाव मावळ येथील महसुलभवन या ठिकाणी राष्ट्रीय समाज सहाय्यक समितीच्या वतीने रक्तदान शिबिर, कोविड 19 च्या दृष्टीने मोफत औषधे वाटप, महिलांना सक्षम बनविण्यासाठी बँक मुद्रालोन संदर्भात मार्गदर्शन, तसेच समितीच्या नवनियुक्त पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र प्रदान समारंभ अशा संयुक्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी अध्यक्षस्थानी माजी पोलीस महासंचालक विठ्ठलराव जाधव तर तहसीलदार मधुसूदन बर्गे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर, समितीचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष दीपक पाटील, आरटीआय प्रशिक्षक प्रविण जिंदम, समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळसकर आदी उपस्थित होते.

विठ्ठलराव जाधव यांनी आपल्या मनोगतात कोरोना महामारी या संदर्भात मार्गदर्शन केले, तसेच संस्थेच्या कार्याला शुभेच्छा दिल्या.

युनियन बँक प्रतिनिधी वैशाली कवडे व हर्षा सहारे यांनी महिलांसाठी बँक मुद्रालोन संदर्भात माहिती दिली व सरकारने सांगितलेल्या बँकेच्या सर्व योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन केले.

समितीच्या राष्ट्रीय अध्यक्षा अर्चना म्हाळसकर यांनी संस्थेच्या सामाजिक कामाचा आढावा दिला. त्या म्हणाल्या की कोरोना महामारीच्या काळात अन्नधान्य वाटप, मोफत औषधे वाटप, अडकलेल्या मजुरांना त्यांच्या मूळ गावाला सोडण्यासाठी मदत असेल असे अनेक समाजोपयोगी उपक्रम त्या काळात राबविले व आज सुद्धा संस्था कौटुंबिक वाद, जागेसंदर्भातले वाद मिटवण्याचे काम करत आहे.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनंता कुडे यांनी केले. संस्थेचे पदाधिकारी संदीप नाईक, जितेंद्र कुडे, गोविंद जाधव, प्रशांत येळवंडे, आरती परदेशी, रामचंद्र कुऱ्हाडे, समीर दौंडे, विमल काजळे सुनिता काळोखे, जयश्री कवडे आदी जणांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.