Maval News : कुसगाव बुद्रुक येथे महिलांसाठी केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर

एमपीसी न्यूज – पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याकरिता नारी सबलीकरण व सक्षमीकरणकरीता, ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने मावळ भाजप महिला आघाडीच्या वतीने कुसगाव बुद्रूक येथे केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर घेण्यात आले. अनेक महिलांनी या प्रशिक्षण शिबिराचा लाभ घेतला.

मावळ भाजपा महिला आघाडीच्या वतीने कुसगाव बुद्रूक येथे केक बनवण्याचे प्रशिक्षण शिबिर नुकतेच संपन्न झाले. भाजप महिला आघाडी अध्यक्षा सायली बोत्रे यांच्या वतीने व कुसगावच्या सरपंच अश्विनी ज्ञानेश्वर गुंड यांच्या नियोजनाखाली या केकचे प्रशिक्षण घेण्यात आले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आत्मनिर्भर भारताचे स्वप्न साकार करण्याकरिता नारी सबलीकरण व सक्षमीकरणकरीता व ग्रामीण भागातील महिलांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे या उद्देशाने हा उपक्रम राबविल्याचे बोत्रे व गुंड यांनी सांगितले.

कार्यक्रमाला नाणे मावळ अध्यक्षा सीमा आहेर, तालुका उपाध्यक्ष अश्विनी तिकोणे, ज्ञानेश्वर गुंड, शक्तीकेंद्र प्रमुख मधुकर कडू, बुथ अध्यक्ष मदन गाडे, ग्रामपंचायत सदस्या वर्षा मधुकर कडू, फसीन मज्जिद शेख, राजू काटकर, भरत मोरे, किसन महादू गुंड पोलीस पाटील, मुख्याध्यापक मानकर, प्रशिक्षक मोहिनी माने यांच्यासह कुसगाव येथिल महिला भगिनी मोठ्या संख्येने केक प्रशिक्षणाला उपस्थित होत्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.