Maval News: उत्तर प्रदेश बलात्कार निषेधार्थ उद्या वडगाव मावळमध्ये कँडल मार्च

वडगाव मावळ – हाथरस (उत्तर प्रदेश) येथील 19 वर्षीय तरुणीवर चार नराधमांनी बलात्कार करुन निर्घृणपणे छळ केला.  मंगळवार (दि.29) रोजी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. मृतदेह अंत्यविधी करण्यासाठी नातेवाईकांना न देता मध्यरात्रीच अंत्यविधी केल्याच्या निषेधार्थ मेहतर वाल्मिकी समाज सकल पंच मावळच्या वतीने गुरुवार (दि.1) दुपारी 12 वा. तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी अ‍ॅड गायत्री रिले म्हणाल्या बेटी बचाव बेटी पढाव खरंच बेटी वाचवली जाते का ? उत्तर प्रदेशात सलग तीन बलात्काराच्या घटना घडल्या. आरोपींना फाशीची शिक्षा दिली तरच त्या पीडितेला न्याय मिळेल. रामाच्या जन्मभूमीत अशा घटना घडत आहे. योगी सरकार व मोदी सरकार यांनी या आरोपीला त्वरित फाशीची शिक्षा द्यावी. मृतदेह नातेवाईकांना न देता मध्यरात्री अंत्यविधी केला यातील दोषींवर कारवाई करा. या निषेधार्थ शुक्रवारी (दि.2) संध्याकाळी 5.30 वा. पोटोबा महाराज मंदिर ते तहसीलदार कार्यालयापर्यंत कँडल मार्च काढण्यात येणार आहे.

याप्रसंगी धर्मेश रिले, धनराज जेधे, यश रिले, संजय चव्हाण, गणेश वाल्मिकी, अतिष वाल्मिकी, दयाल रिले, अ‍ॅड गायत्री रिले, महेश रघुवंशी, तेजस जेधे, विशाल मोरे व बहुसंख्य समाज बांधव उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.