Maval News: कान्हे येथील चंद्रभागा रघुनाथ सातकर यांचे निधन

एमपीसी न्यूज – कान्हे येथील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या चंद्रभागाबाई रघुनाथ सातकर (वय 83) यांचे आज (बुधवारी) अल्पशा आजाराने निधन झाले. मावळ तालुक्याचे दिवंगत माजी आमदार रघुनाथदादा शंकरराव सातकर यांच्या त्या पत्नी होत्या.

त्यांच्या पश्चात मुलगा, मुलगी, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे.

उद्योजक विजय रघुनाथ सातकर यांच्या मातोश्री तर मावळ तालुका दिंडी समाजाचे उपाध्यक्ष राजेंद्र सातकर व युवा उद्योजक गौरव सातकर यांच्या त्या आजी होत.

अंत्यविधी उद्या (गुरूवार) सकाळी नऊ वाजता खापरे ओढा, कान्हे या ठिकाणी होणार आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.