Maval News : आढे ग्रामपंचायत हद्दीत विविध विकासकामांना प्रारंभ

एमपीसीन्यूज : आढे ग्रामपंचायत हद्दीत आमदार सुनील शेळके, पुणे जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती बाबुराव वायकर, नितीन मराठे यांच्याकडून मिळालेल्या एकूण 38  लाख रुपयांच्या निधीतून विविध विकास कामे सुरु असल्याचे सरपंच सुनीता ज्ञानेश्वर सुतार व उपसरपंच ज्ञानेश्वर हिंगडे यांनी दिली.

पुणे जिल्हा परिषदेचे सभापती बाबुराव वायकर यांच्या निधीतून स्मशानभूमी निवारा शेड ३ लाख रुपये, पाण्याची टाकी ते विश्वनाथ ठाकर यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता 9 लाख रुपये, मुख्य रस्ता ते पाण्याची टाकी सिमेंट काँक्रीट रस्ता 9 लाख रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, काही ग्रामस्थांच्या विरोधामुळे हा रस्ता प्रलंबित आहे.

जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे यांच्या निधीतून शामराव सुतार घरापासून दशरथ हिंगडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 3 लाख रुपये, जिल्हा परिषद शाळा ते किसन सुतार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 3 लाख रुपये व पाण्याचा पंप ते स्मशानभूमीपर्यंत सिमेंट काँक्रीट रस्ता 5 लाख रुपयांचा तर आमदार सुनील शेळके यांच्या निधीतून गणपती मंदिर ते शंकर सुतार यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीट रस्त्यासाठी 6 लाख रुपयांचा निधी मिळाला आहे.

ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक 2021  बिनविरोध झाल्यापासून गावात विविध विकास कामे सुरू आहेत. सरपंच, उपसरपंच व सदस्य सर्व तरुण असून एकविचाराने हे सर्वजण गावात विकासाची गंगा आणून गाव विकासाचे मॉडेल करत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण आहेत.

या वेळी सरपंच सुनीता सुतार, उपसरपंच ज्ञानेश्वर हिंगडे, सदस्य मैना ठाकर, संगीता सुतार, जालिंदर बोत्रे, मच्छिंद्र सुतार, भामाबाई सुतार, माजी उपसरपंच युवराज सुतार, ज्ञानेश्वर सुतार, विश्वनाथ सुतार, पोलीस पाटील सुभाष ठाकर, पिंटू तिडके, महेश ठाकर, संदीप सुतार आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.