Maval News : लोणावळा, देहूरोड येथील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील लोणावळा व देहूरोड येथील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी गुरुवारी (दि. 21) मुंबई येथील राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड, आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

 

लोणावळा नगरपरिषद व देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ऐनवेळी लोणावळा व देहूरोड येथील कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मावळात कॉंग्रेसला मोठे खिंडार पडले आहे. यामुळे मावळातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये लोणावळा व देहूरोड येथे राष्ट्रवादीस सत्ता प्रस्थापित करणे सोपे होणार आहे.
लोणावळा नगरपरिषदेत यापूर्वी भाजप आणि कॉंग्रेस यांच्या युतीतुन सत्ता प्रस्थापित झाली होती. मात्र आमदार शेळके यांनी लोणावळ्यातील कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना देखील राष्ट्रवादीत घेतल्याने याचा मोठा फटका भाजपला बसणार आहे

 

यावेळी कॉंग्रेसचे लोणावळा शहर माजी उपनगराध्यक्ष व माजी लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर, माजी उपनगराध्यक्ष संजय घोणे, कॉंग्रेस कामगार आघाडी अध्यक्ष फकीर गवळी, कॉंग्रेस लोणावळा शहर उपाध्यक्ष राजू तिकोने, कॉंग्रेसचे जेष्ट नेते प्रकाश हरपुडे, माजी शिक्षण मंडळ सदस्य पांडुरंग घर्डे तसेच कॉंग्रेसचे देहूरोड शहर कार्याध्यक्ष दीपक बाबुराव चौगुले, कॉंग्रेस आय देहूरोड शहर युवकाध्यक्ष संदीप रामकिसन डुगळज, भारतीय वाल्मीकी समाज उपाध्यक्ष संदीप सुरेश बोथ, कॉंग्रेस अल्पसंख्यांक सेल मावळ उपाध्यक्ष इस्माईल इब्राहीम शेख या पदाधिकाऱ्यांसह कॉंग्रेसचे लोणावळा व देहूरोड येथील अमोल ओंबळे, किरण येवले, अशोक रोकडे, दीपक हुंडारे, अमृता अमोल ओंबळे, स्वाती सुनिल ओंबळे, कविता हरपुडे, ज्योती हरपुडे, गीता तिकोने, संगीता बीडकर, अनीता चव्हाण, आरती परदेशी, लता मोरे, राधा पांगारे, राजश्री नाणेकर,विमल घरदाळे, सावित्री सुनके, सुजाता जाधव, वैशाली शिरसाट, दुर्गा तळेगावकर,विशाल खिलारे, बाबू बोडके, सोमऊ चव्हाण, उमेश बाफणे, फाल्गुन चौधरी, नाना शिरसाट,दादा काळे, हिरामन साळुंके, पंकज तंतरपाळे, रवी पवार , कुलदीप पवार, नईम शेख आदि कार्यकर्त्यांनी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे.

 

या प्रसंगी जितेंद्र आव्हाड म्हणाले की, पंचवीस वर्षांच्या प्रयत्नांनंतर अशक्य असा मावळचा बालेकिल्ला आमदार शेळके यांनी जिंकला. केवळ निवडून न येता जनसेवेच्या कामांचा ओघ त्यांनी सुरु केला, असे सांगत जितेंद्र आव्हाड यांनी सुनिल शेळके यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. लोणावळा परिसरातील सर्वसामान्य नागरिकांना कमी दरात घर उपलब्ध करून देण्याचे आश्वासन आव्हाड यांनी यावेळी दिले. विलास बडेकर यांनी घेतलेल्या निर्णयाचे स्वागत करून पवार साहेबांच्या पुरोगामी विचाराला मावळ विधानसभेत पुढे नेण्यासाठी ते सहकार्य करतील, असा विश्वास आव्हाड यांनी व्यक्त केला. तसेच सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत करून पुढील राजकीय वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

 

यावेळी लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड, देहूरोड शहर अध्यक्ष प्रवीण झेंडे, लोणावळा महिला शहराध्यक्ष उमा मेहता, माजी नगरसेवक आरोही तळेगावकर, माजी शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे, दिपक हुलावळे, उद्योजक नंदू वाळूंज आदि उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.