Maval News: कार्ल्याच्या एकवीरा देवी गडाचा सुधारीत विकास आराखडा तयार करा – मुख्यमंत्री

आमदार सुनील शेळके यांच्या पाठपुराव्याला यश

एमपीसी न्यूज –  कार्ला येथील आई एकवीरा देवी गडाचा सुधारीत विकास आराखडा तयार करण्यात यावा, असे आदेश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (बुधवारी) दिले.

महाराष्ट्रातील भाविकांचे श्रद्धास्थान व कोळी-आगरी बांधवांचे कुलदैवत असलेल्या कार्ला येथील आई एकवीरा देवी गडाचे व परिसरातील ऐतिहासिक लेण्यांचे जतन, संवर्धन करण्यासह विकास आराखडा तयार करण्याबाबत मुख्यमंत्री  उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली ‘वर्षा’ या निवासस्थानी बैठक झाली. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी वरील आदेश दिले.

या बैठकीस पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, मावळचे आमदार सुनील शेळके, पर्यटन विभागाच्या प्रधान सचिव वल्सा नायर, एमटीडीसी संचालक सावलकर, पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, आर्किटेक्ट शब्बीर उनवाला व संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

आई एकविरा देवी गड व परिसरातील लेण्यांचे जतन व संवर्धन करण्याबाबत सुधारित विकास आराखडा तयार करण्याच्या सूचना मुख्यमंत्री ठाकरे यांनी बैठकीत दिल्या.

मावळ तालुक्यातील पर्यटन व धार्मिक स्थळांच्या विकासाला गती मिळावी व त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी आमदार सुनील शेळके प्रयत्नशील आहेत. गडावर येणाऱ्या भाविकांना पायाभूत व आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात त्यामध्ये भक्तनिवास, लिफ्ट, दर्शनरांगेचे नियोजन, सुशोभित गार्डन, हेलिपॅड, इतर दुकाने, पाण्याची टाकी, स्वच्छतागृह इ. सर्व गोष्टींचा समावेश असणार आहे, असे आमदार शेळके यांनी सांगितले.

एकविरादेवी मंदिर व लेणी विकासकामांसह पंचक्रोशीतील सर्व नागरिकांसाठी मुलभूत सोयीसुविधांचा समावेश या विकास आरा

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.