Maval News : भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी दत्तात्रय घोजगे

एमपीसी न्यूज – आंबी मावळ येथील भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रगतीशील शेतकरी दत्तात्रय चिंधू घोजगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. पूर्वीचे अध्यक्ष नामदेव बनसोडे यांनी राजीनामा दिल्याने हे पद रिक्त झाले होते.

अध्यक्षपदाची जागा रिक्त झाल्याने अध्यक्ष निवडीसाठी अध्यासी अधिकारी म्हणून व्ही. पी. खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवार (दि.31) रोजी सहाय्यक निबंधक सहकारी संस्था वडगाव मावळ या कार्यालयात विशेष सभा घेण्यात आली. यावेळी अध्यक्षपदासाठी दत्तात्रय चिंधू घोजगे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांची अध्यक्षपदावर बिनविरोध निवड जाहीर केली.

याप्रसंगी संस्थेचे माजी चेअरमन व संचालक भगवान शिंदे, पिराजी वारींगे, रामनाथ घोजगे, स्मिता हिरवे, रामनाथ कलवडे, महेंद्र वारींगे, पिराजी दरेकर व समाज भूषण हभप धोंडीबा घोजगे, संभाजी घोजगे, गणेश घोजगे, संदीप घोजगे, सुभाष बिबवे, सुरज पवार, नामदेव कारके, नवनाथ सुतार, दिलीप कारके, योगेश घोजगे, राहूल बनसोडे, देविदास पोटवडे, अनिल घोजगे, अनिल मनोहर घोजगे, सचिव गुलाब ढोरे, सचिव दत्तात्रय वारींगे, सभासद व परिसरातील मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

दत्तात्रय चिंधू घोजगे यांची भैरवनाथ विविध कार्यकारी सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याने आंबी व मावळ भागातून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.