Maval News: साते, कान्हे, नायगाव, चिखलसे या गावांमध्ये विविध विकास कामांचे लोकार्पण

एमपीसी न्यूज – पुणे जिल्हा परिषद निधीतून सुमारे 55 लाख रूपये खर्चून मावळ तालुक्यातील साते, कान्हे, नायगाव, चिखलसे या गावांमध्ये करण्यात आलेल्या विविध विकास कामांचे उद्घाटन  व लोकार्पण रविवार (दि 11) रोजी करण्यात आले.

जिल्हा परिषद  कृषी व पशुसंवर्धन समितीचे सभापती  बाबुराब आप्पा वायकर यांच्या जिल्हा परिषद फंडातून व विशेष प्रयत्नातून 55 लाख रूपये खर्चून   साते येथे व्यायाम शाळा, अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण आणि सभा मंडप व  नवघणे पडाळ येथे अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण,  कान्हे(आंबेवाडी), नायगाव, (येवलेवाडी) येथील अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले.चिखलसे या ठिकाणी शाळेची संरक्षक भिंत व अंतर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्यात आले.

55 लक्ष रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन व लोकार्पण मावळचे आमदार  सुनील आण्णा शेळके व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष बबनराव भेगडे, सभापती बाबुराव आप्पा वायकर, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष  सचिन घोटकुले, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस ब्लाॅक अध्यक्ष  सुभाष जाधव, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे सरचिटणीस  विशाल वहिले, कामशेतचे माजी सरपंच  तानाजी दाभाडे आदीच्या शुभहस्ते करण्यात आले.

यावेळी सरपंच-विठ्ठल मोहिते, माजी सरपंच संदीप अगळमे, अनिल मोहिते, प्रकाश अगळमे, ज्ञानेश्वर नवघणे,  कान्हेचे सरपंच-विजय सातकर, टोनिशेठ चावला, दत्तोबा चोपडे,भाऊ लालगुडे,पै.सुनील दंडेल,गणेश पं ढोरे,,भाऊसाहेब ढोरे, सुहास वायकर,सुनील चव्हाण, अक्षय रौधळ, सुजित माझिरे,अतुल राऊत, नवनाथ शेळके,बाबाजी चोपडे,कुणाल ओव्हाळ, माझी सरपंच सागर येवले,बाळासाहेब काजळे,विजय काजळे,बंडोपंत सातकर,किशोर सातकर,सोनाली सातकर,महेश सातकर इत्यादी प्रमुख मान्यवर व समस्थ ग्रामस्थ माता भगिनी उपस्थित होते.

या वेळी सरपंच विजय सातकर, माजी उपसरपंच-बाळासाहेब काजळे यांनी आप्पांचे आभार मानून सत्कार करण्यात आला.

आगामी काळातही ग्रामीण भागातील मूलभूत कामांसाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विशेष निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन वायकर यांनी दिले. चिखलसेचे माजी उपसरपंच बाळासाहेब काजळे यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.