Maval News : कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याची मावळ तालुका राष्ट्रवादी युवकची मागणी

एमपीसी न्यूज – पाणी उपसा करणाऱ्या मोटारीत वारंवार बिघाड होत असल्याने कातवी परिसरात पाणीपुरवठा करण्यात वारंवार अडचणी येत आहेत. त्यामुळे येथे स्टॅन्डबाय मोटर बसवण्याची मागणी मावळ तालुका राष्ट्रवादी युवकचे उपाध्यक्ष प्रवीण ढोरे यांनी वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयुर ढोरे व उपनगराध्यक्षा पूजा वहिले यांच्याकडे केली आहे. याबाबत प्रवीण ढोरे यांनी नगराध्यक्ष व उपनगराध्यक्ष यांना निवेदन दिले आहे. यावेळी युवा कार्यकर्ते दत्तात्रय पिंपळे, गणेश चव्हाण उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आहे की वडगाव नगरपंचायत हद्दीत असलेल्या कातवी येथे सुमारे 800 लोकसंख्या असून येथील पाणीपुरवठ्यासह इतर ठिकाणी म्हणजेच प्रभाग क्र. 17 मधील काही भाग व टाटा हाउसिंग सोसायटी येथे पाणी,पुरवठा होत आहे. मात्र, काही महिन्यांपासून येथील पाणीपुरवठा करणारी मोटर वारंवार बंद पडत आहे. त्यामुळे पाणीपुरवठा करण्यास अडचण निर्माण होत आहे.

नागरिकांस वारंवार उद्भवणारी पाण्याची समस्या दुर करण्यासाठी कातवी जॅकवेल येथे वायपीस बसवून 60 एचपी कार्यक्षमता असलेली मोटर पॅनल बोर्ड सह स्टँन्ड बाय करणे अती गरजेचे आहे त्यामुळे पाणी टंचाईचा भेडसावणारा प्रश्न कायमचा सुटेल असे निवेदनात स्पष्ट करण्यात आले असून याबाबत नगराध्यक्ष मयुर ढोरे यांनी मागणीचा विचार करुन लवकरच कातवी येथे स्टॅन्ड बाय मोटर बसवण्याचे आश्वासन दिले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.