Maval News : केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करण्याची मागणी

एमपीसी न्यूज : वडगाव मावळ येथील नगरपंचायतीच्या हद्दीतील केशवनगर व कातवी येथील जिल्हा परिषद शाळांमध्ये लसीकरण केंद्र सुरू करावे, अशा प्रकारची मागणी माजी ग्रामपंचायत सदस्य व मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष प्रवीण विठ्ठल ढोरे यांनी नगराध्यक्ष मयुर ढोरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यावेळी नगरसेवक व वडगाव शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष राजेंद्र कुडे, नगरसेवक दिलीप म्हाळसकर, युवा नेते शरद ढोरे, सामाजिक कार्यकर्ते सिताराम पिंपळे आदी उपस्थित होते.

1 मे पासून 18 वर्षे वयावरील सर्व नागरिकांना लसीकरण करण्यात येणार असल्याने कातवी व केशवनगर भागातील नागरिकांच्या सोयीसाठी केशवनगर जिल्हा परिषद शाळा व कातवी येथील जिल्हा परिषद शाळेत लसीकरण केंद्र सुरू करावे त्यामुळे वडगाव मावळ येथील उपकेंद्रावर सुरू करण्यात आलेल्या लसीकरण केंद्रावरील गर्दीचे प्रमाणही कमी होईल.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.