Maval News : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीला महाआवास अभियान पुरस्कार प्रदान

 

एमपीसी न्यूज – महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग, राज्य व्यवस्थापन कक्ष, ग्रामीण गृहनिर्माण विभागा यांच्या वतीने देण्यात येणारा ‘महाआवास अभियान पुरस्कार’ मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुणे येथील विधानभवन मध्ये पुरस्कार वितरण समारंभ पार पडला. आंदर मावळातील उद्योगनगरी अशी टाकवे बुद्रुक या गावाची तालुक्यात ओळख आहे. या पुरस्काराबद्दल गावक-यांनी आनंद व्यक्त केला.

टाकवे बुद्रुक ग्रुपग्रामपंचायतीला उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते महाराष्ट्र शासन ग्रामविकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्काराने उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल गौरविण्यात आले.

जिल्हाधिकारी राजेश देशमुख,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, कृषी व पशुसंवर्धनचे सभापती बाबुराव वायकर, पुणे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद यांच्या सह जिल्हा परिषदेचे पदाधिकारी शासकीय अधिकारी उपस्थितीत होते.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष -ग्रामीण गृहनिर्माण विभागाच्यावतीने महाआवास अभियान पुरस्कार मावळ तालुक्यातील टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीस प्रदान करण्यात आला आहे.

पुणे येथील विधानभवनमध्ये उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते टाकवे ग्रामपंचायतीचे सरपंच भुषण असवले,  ग्रामविकास अधिकारी एस. बी. बांगर,मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी कार्याध्यक्ष शिवाजी असवले, आंदरमावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष मारूती असवले, ग्रामपंचायत सदस्य ऋषीनाथ शिंदे,सदस्य अविनाश असवले, परशुराम मालपोटे व कनिष्ठ लिपिक सुशिल वाडेकर यांनी हा पुरस्कार स्वीकारला.

सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र असे पुरस्काराचे स्वरूप होते.

सरपंच भूषण असवले म्हणाले,” आमदार सुनील शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली गाव पातळीवर काम करताना सर्व ग्रामपंचायत सदस्य,प्रशासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधींनी केलेल्या सहकार्याने हा पुरस्काराने मिळाला ही प्रेरणा घेऊन अधिक चांगले काम करण्यासाठी प्रयत्नशील राहील.

महाराष्ट्र शासन ग्राम विकास विभाग राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण महा आवास अभियान पुरस्कार सन- 2020/2021 प्रधान मंत्री आवास योजना -ग्रामीण विभागस्तरीय सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत म्हणून मावळ तालुक्यातील उद्योग नगरी म्हणून ओळखली जाणारी ग्रामपंचायत टाकवे बुद्रुक या ग्रामपंचायतीला पुणे जिल्ह्यामध्ये प्रथम क्रमांकाचा बहुमान मिळाला. आंदर मावळातील उद्योगनगरी म्हणून ओळखली जाणाऱ्या  टाकवे बुद्रुक ग्रामपंचायतीला हा बहुमान मिळाल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त केला.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.