Maval News : त्रिपुरारी पौर्णिमेला लोहगड शिवस्मारकावर दीपोत्सव

एमपीसी न्यूज – लोहगड-विसापूर विकास मंचाच्या वतीने त्रिपुरारी पौर्णिमेला लोहगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या शिवस्मारकावर भव्य दीपोत्सव करण्यात आला. मंच गेली एकवीस वर्षे लोहगड व विसापूर किल्ल्याच्या जीर्णोद्धार करण्यासाठी कार्यरत आहे. या दीपोत्सवासाठी पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे उपमहापौर केशव घोळवे सहकुटुंब उपस्थित होते.

यावेळी शिवस्मारकावर रांगोळ्या व पणत्यांनी लखलखता दीपोत्सव करण्यात आला. उपमहापौरांनी मंचाच्या कार्याचे कौतुक केले. लोहगड ग्रामस्थ व मंचाच्या पुढाकाराने साकारण्यात येणाऱ्या शिवसृष्टीच्या तांत्रिक बाबींसाठी सर्वतोपरी मदत व सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. आगामी काळात लोहगडाच्या पायथ्याशी भव्य शिवसृष्टी साकारण्याचा मनोदय मंचाचे संस्थापक सचिन टेकवडे यांनी व्यक्त केला.

या कार्यक्रमासाठी गणेश धानीवले,राजू शेळके, रमेशमामा बैकर, शंकर चिव्हे, पोपट दिघे, बाळू बैकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंचाचे अध्यक्ष विश्वास दौंडकर, कार्याध्यक्ष सागर कुंभार, अनिकेत आंबेकर, गणेश उंडे, अमोल गोरे, अमोल मोरे, रुपेश लोखंडे, चेतन जोशी, संदीप गाडे, अजय मयेकर आदी कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.