Maval News : एमआयडीसी भागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांसाठी बाळा भेगडे यांची उद्योगमंत्र्यांसोबत चर्चा

एमपीसीन्यूज – मावळ एमआयडीसी भागातील शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नासाठी माजी मंत्री बाळा भेगडे यांनी उद्योगमंत्री सुभाष देसाई यांना फोन केला तसेच एमआयडीसी अधिकाऱ्यांसोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे चर्चा केली.

यावेळी प्रादेशिक अधिकारी अविनाश हदगल, प्रांताधिकारी संदेश शिर्के, शांताराम कदम, भिकाजी भागवत, कृष्णा भांगरे, ॲड. सोमनाथ पवळे, प्रशांत ढोरे, गणेश कल्हाटकर, मोहन घोलप, संतोष जाचक, नथू थरकुडे, गणेश भांगरे, गोपाळ पवळे, हरिभाऊ पवळे, बुधाजी जगेश्वर, बंडू कदम, विठ्ठल कदम, तानाजी करवंदे, बाबुलाल गराडे, मंगेश शेलार, संदेश शेलार आदी मान्यवर उपस्थित होते.

एमआयडीसी टप्पा-4 मधील विविध प्रश्नांसंदर्भात माजी मंत्री संजय तथा बाळा भेगडे यांनी पुण्यातील एमआयडीसी कार्यालय येथे कृती समिती पदाधिकारी, शेतकरी, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासमवेत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली.

यावेळी निगडे-आंबळे नियोजित एमआयडीसीची पुढील कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावी. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी नियोजित एमआयडीसीमध्ये कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात यावी, तसेच टप्पा 1 व 2 मधील प्रलंबित विषय पूर्ण करण्याची विनंती केली.

याच बरोबर राज्याचे उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्या सोबत फोनवर चर्चा करून 32/1 ची अंमलबजावणी लवकरात लवकर करावी, अशी मागणी यावेळी केली. त्यावर मंत्री देसाई यांनी सकारात्मक चर्चा करून लवकर निर्णय करू, असे आश्वस्त केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.