Maval News: वारंगवाडी येथे वाफेचे मशीन, रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळयांचे वाटप 

एमपीसी न्यूज – कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती निर्माण व्हावी, माझे कुटूंब माझी जबाबदारी मोहिमेतंर्गत वारंगवाडी, गोळेवाडी मावळ येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेस मावळ व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या वतीने 200 कुटुंबांना वाफ घेण्याचे मशीन आणि जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर यांच्या वतीने रोगप्रतिकार शक्तीवर्धक गोळया उपलब्ध करून देण्यात आल्या. 

सोमवार (दि 28) रोजी वारंगवाडी, गोळेवाडी येथील घरोघरी जाऊन रोगप्रतिकार शक्ती वर्धक गोळया वाटप व गावातील ग्रामस्थांची जाऊन आरोग्य तपासणी, इलेक्ट्रीक  मशीनद्वारे सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.

याप्रसंगी मावळचे आमदार सुनील शेळके,  जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती बाबुराव वायकर, रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीच्या अध्यक्षा रो रजनीगंधा खांडगे, नवलाख उंब्रेचे सरपंच दत्तात्रय पडवळ, आंदर मावळ राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष विक्रम कलवडे, उद्योजक प्रफुल्ल शिंदे, सतिश कलवडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते तुकाराम वारींगे, उद्योजक संजय वारींगे, कामगार नेते नितीन नखाते, उद्योजक महेंद्र बो-हाडे,  धनंजय काकडे, गणेश थोरवे, नितीन वारींगे, मिथुन शेळके, शामकांत पवार, रूपेश चव्हाण, स्वप्निल चव्हाण आदीजण उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.