Maval News : आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त कशाळ येथे टी-शर्ट व डस्टबिनचे वाटप

स्वयंभू फाउंडेशचे संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांचा उपक्रम

एमपीसी न्यूज – मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त स्वयंभू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष माजी सरपंच दत्तात्रय पडवळ यांच्या वतीने आमदार शेळके यांच्या वाढदिवसानिमित्त व नवरात्र उत्सवानिमित्त टीशर्ट आणि स्वच्छतेसाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. 

यावेळी माजी सरपंच विठ्ठल जाधव, सरपंच शरद जाधव,माजी उपसरपंच तुकाराम जाधव,तंटामुक्ती समिती अध्यक्ष नवनाथ जाधव,अध्यक्ष श्री मळुबाई प्रतिष्ठान प्रशांत जाधव, उपाध्यक्ष शंकर जाधव, कार्याध्यक्ष नरेश जाधव, शालेय व्यवस्थान समिती उपाध्यक्ष रामकृष्ण जाधव,माजी सरपंच भाऊ गवारी,माजी उपसरपंच योगेश मदगे,उपाध्यक्ष रा.कॉं.सोशल मिडिया मंगेश जाधव,माजी अध्यक्ष राष्ट्रवादी कॉंग्रेस रामदास जाधव,सहचिटणीस रा.कॉं.सोशल मिडीया शंकर मोढवे,आंदर मावळ अध्यक्ष वैभव पिंगळे, दिपक मदगे,शालेय व्यवस्थान समिती सदस्य काळुराम जाधव,भाऊ सुतार,शाम पवार, सोन्या पवार, पंकज पडवळ,अक्षय अडिवळे, आकाश जांभुळकर,सुग्रीव चव्हाण,श्री मळुबाई प्रतिष्ठान खजिंनदार राहुल जाधव,सुरेश जगताप,किरण जाधव, रूपेश जाधव, तानाजी शिंदे,ऋषिकेश जाधव,गणेश जाधव,चेतन जाधव,विनोद जाधव, बाळासाहेब जगताप,बाळासाहेब जाधव, नितिन जगताप, मारुती जाधव, विष्णु जाधव,दासु शिंदे,गबळु जाधव, गोमाजी जगताप, नितिन जाधव, श्रीमळुबाई प्रतिष्ठानचे युवक,महिला, पदाधिकारी व स्वयंभू फाउंडेशनचे सदस्य व गावातील ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी पडवळ आपल्या भाषणात म्हणाले की, आपलं गाव स्वच्छ तर आपला देश  स्वच्छ होईल या हेतूने  डस्टबीन वाटपाचा कार्यक्रम हाती घेतला आहे.  आपल्या आजूबाजूला कचरा न टाकता, तो कचरा डस्टबिनमध्ये टाकून जेणे करुन कचर्‍याची विल्हेवाट योग्य होईल व आपल्या आवती भोवतीच्या निसर्गाचा र्‍हास होणार नाही, असे आवाहन दत्ता पडवळ यांनी केले.

माजी सरपंच विठ्ठल जाधव यांनी या कार्यक्रमानिमित्त दत्तात्रय पडवळ यांचे कौतुक केले. पडवळ यांनी जो उपक्रम हाती घेतला आहे त्याउपक्रमातुन संपूर्ण मावळ तालुका कचरा मुक्त होईल व त्यानिमित्त मावळचे आमदार सुनील  शेळके यांना वाढदिवसाच्या नक्कीच शुभेच्छा मिळतील, अशी भावना व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम जाधव व विठ्ठल जाधव यांनी केली. कार्यक्रमाचे आभार प्रशांत जाधव यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.