Maval News : तालुक्यातील सरपंच, उपसरपंच पदांसाठी 9 आणि 10 फेब्रुवारीला होणार निवडणुका

एमपीसी न्यूज : मावळ तालुक्यातील निवडणूक झालेल्या 57 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी मंगळवार (दि 9) व बुधवार (दि 10) फेब्रुवारी रोजी निवडणूका होणार आहे. अशी माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व नायब तहसीलदार रावसाहेब चाटे यांनी दिली.

मावळ तालुक्यातील मुदत संपलेल्या 57 ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणुक नुकतीच पार पडली असून सरपंच, उपसरपंच पदाच्या निवडीकडे तालुक्यातील सर्वांचे लक्ष लागले आहे.

जिल्हाधिकारी डाॅ राजेंद्र देशमुख यांनी या निवडीचा कार्यक्रम जाहीर केला असून त्यानुसार मावळ तालुक्यातील 57 ग्रामपंचायतींच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी मंगळवार दि 9 व बुधवार दि 10 फेब्रुवारीला निवडणूका होणार आहे.

▪️ मंगळवार दि 9 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणुका
आंबी, आढे, आपटी, उकसान, इंगळुन, करंजगाव, कार्ला, कोथुर्णे, खडकाळा, चिखलसे, नवलाखउंब्रे, माळेगाव बु., मळवली, वेहेरगाव, तिकोणा, येलघोल, टाकवे बुद्रुक, घोणशेत, सोमाटणे, पाचाणे, परंदवडी, साते, मोरवे, थुगांव, शिवणे, महागाव, नाणे, वडेश्वर, सांगावडे.

▪️ बुधवार दि 10 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच पदांसाठी निवडणुका –
अजिवली, आढले खु, आंबेगाव, उर्से, कशाळ, कांब्रे नामा, कुसगाव बु.,कुसगाव खुर्द, कुसगाव पमा, कुरवंडे, कुसवली, खांड, खांडशी, गहुंजे, गोवित्री, दारूंब्रे, डाहुली, धामणे, ताजे, बौर, पाटण, मळवंडी ठूले, माळवाडी, येळसे, वारू, शिवली, शिरदे, साई.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.