सोमवार, सप्टेंबर 26, 2022

Maval News: वडगाव येथे विद्युत दाहिनीच्या कामास लवकरच होणार सुरुवात

एमपीसी न्यूज – ​वडगाव मावळ ​येथील विद्युत/ गॅस दाहिनी शेड तयार असल्याने पर्यावरणाचा -हास  होऊ नये म्हणून रोटरी क्लबच्या वतीने सामाजिक बांधिलकीतून विद्युत वाहिनी व गॅस दाहिनी मावळ तालुक्यातील प्रमुख शहरांना हि उपकरणे देण्याची योजना केली आहे.

वडगाव ग्रामपंचायत असताना रोटरी क्लब यांनी दिले होते. तसे ठरावाचे पत्र ग्रामपंचायतीने रोटरी क्लबला यापूर्वीच दिले होते. सध्या कोरोनाच्या काळात कोव्हिडचे रुग्ण मृत होण्याची संख्या वाढल्याने या रुग्णांचे दहन करण्याची सुविधा तळेगाव दाभाडे येथे आहे. मृतांची संख्या वाढत असल्याने नातेवाईक मंडळी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण होत आहे. म्हणूनच वडगाव नगरपंचायतचे नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी दिंनाक ​​​28 ऑगस्ट 2020 रोजी आमदार सुनिल आण्णा शेळके यांच्या माध्यमातून शासनाकडे व रोटरी क्लबकडे पत्राद्वारे मागणी केली होती.

तरी लवकरच रोटरी क्लबच्या माध्यमातून वडगाव येथे विद्युत दाहिनीचे कामास सुरूवात होणार आहे. अशी माहिती रोटरी क्लबचे अध्यक्ष संतोष शेळके व नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष चंद्रजीत वाघमारे यांनी दिली आहे.

spot_img
Latest news
Related news