Maval News : पोल्ट्री व्यावसायिकांच्या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांनी संघटित होणे गरजेचे – सोनबा गोपाळे

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील काही पोल्ट्री व्यावसायिक कंपन्या तालुक्यातील पोल्ट्री व्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय करीत आहेत. यासाठी सर्व शेतकऱ्यांनी संघटीत होणे गरजेचे आहे, असे मत मावळ तालुका पोल्ट्री व्यावसायिक संघटनेचे संघटक सोनबा गोपाळे गुरूजी यांनी केले. मावळ पोल्ट्री व्यावसायिक संघटनेच्या वतीने आयोजित केलेल्या आंदर मावळ दौऱ्यात गोपाळे गुरूजी बोलत होते.

यावेळी त्यांच्यासह संघटनेचे प्रमुख उद्योजक एकनाथ गाडे, ॲड. चंद्रकांत खांदवे, सोमनाथ राक्षे, प्रविण शिंदे, विनायक बधाले, संभाजी केदारी, सुभाष केदारी, हनुमंत बधाले, महेश कुडले, भरत लष्करी, उत्तम शिंदे, संदीप मालपोटे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

मावळ तालुक्यातील पोल्ट्री व्यवसायाच्या संघटनेसाठी रविवार (दि 26) आंदरमावळ दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. या दौऱ्यात नाणोली, साई – वाऊंड, घोणशेत, खरमारवाडी, बेलज, राजपुरी, टाकवे, फळणे, माऊ, वडेश्वर, वहानगाव, शिंदेवाडी, नागाथली, कुसवली, कांब्रे, डाऊली, भोयरे, इंगळून या ठिकाणचे शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

घोणशेत, वडेश्वर, भोयरे या ठिकाणी झालेल्या बैठकीत शेतकऱ्यांनी आपल्या व्यथा मांडल्या. कंपन्यां शेतकऱ्यांना वेळेवर पेमेंट करीत नाही. कंपन्यां शेतकऱ्यांना अन्यायकारक वागणूक देतात. कंपनीकडून गुणवत्तापूर्ण खाद्य व पक्षी मिळत नाहीत. कंपनीचे सुपरवायझर, मॅनेजर शेतकऱ्यांच्या फार्मवर नियमित भेटी देत नाहीत. अशा असंख्य तक्रारी करण्यात आल्या. यासर्व तक्रारीचे सविस्तर निवेदन तयार करून ते प्रत्येक कंपनीला आमचे पदाधिकारी समक्ष भेटून देणार आहेत असे संघटक गोपाळे गुरूजी यांनी शेतकऱ्यांना सांगितले.

या दौऱ्याचे नियोजन उद्योजक गजानन खरमारे, सुरेश खरमारे, भरत लष्करी, संदीप मालपोटे, उत्तम शिंदे आदींनी केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.