Maval News: चक्रीवादळातील प्रत्येक नुकसानग्रस्तास मदत मिळेपर्यंत लढा चालू राहणार, आसूड मोर्चात भाजपाचा निर्धार

एमपीसी न्यूज – निसर्ग चक्रीवादळात नुकसान झालेल्या प्रत्येकाला योग्य नुकसानभरपाई मिळेपर्यंत लढा चालूच ठेवण्याचा निर्धार मावळ तालुका भारतीय जनता पक्षाच्या वतीने आयोजित आसूड मोर्चात व्यक्त करण्यात आला.  

दिनांक 3 जून 2020 रोजी झालेल्या निसर्ग चक्रीवादळाचा मोठा तडाखा मावळ तालुक्याला बसला. खऱ्याखुऱ्या नुकसानग्रस्तांना शासनाची मदत मिळाली नाही, ज्यांच्या मालमत्तेचे नुकसान झाले आहे त्यांच्या नुकासानीचे परिपूर्ण पंचनामे न होता अनेक बनावट नुकसानग्रस्तांना शासकीय मदत मिळाल्याचा आरोप करीत याच्या निषेधार्थ व नुकसान भरपाई सून वंचित राहिलेल्या खऱ्या नुकसानग्रस्तांना  शासनाची मदत मिळावी यासाठी मावळ तालुका भाजपच्या वतीने पोटोबा मंदिरापासून तहसील कार्यालयावर निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते.

मोर्चाचे नेतृत्व माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे, भाजपचे जिल्हाध्य़क्ष गणेश भेगडे तसेच तालुकाध्यक्ष रवींद्र भेगडे यांनी केले. पक्षाच्या वतीने यावेळी तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन देण्यात आले.

निसर्ग चक्रीवादळाच्या नुकसान भरपाईत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याने त्याच्याविरोधात तालुक्यातील नागरिकांमध्ये मोठा असंतोष आहे. निसर्ग चक्रीवादळामुळे बाधित झालेल्या शेवटच्या व्यक्तीला शासनाची मदत मिळेपर्यंत भाजपा स्वस्थ बसणार नाही असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.तालुक्यातल्या गावागावातून अनेक वंचित शेतकऱ्यांनी हातात आसूड घेऊन तालुका प्रशासनाविरोधातील मोर्चात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
पंचनाम्यांची चौकशी करून दोषी व्यक्तींवर कडक कारवाई करण्याचे तसेच नुकसानभरपाईपासून वंचित राहिलेल्या खऱ्या वादळग्रस्तांना न्याय मिळवून दिला जाईल, असे आश्वासन बर्गे यांनी यावेळी दिले.

मोर्चात भाजपचे तालुका सरचिटणीस सुनील चव्हाण, मच्छिंद्र केदारी, महिला मोर्चा अध्यक्ष सायली बोत्रे,कार्याध्यक्ष सुमित्रा जाधव, माजी तालुकाध्यक्ष प्रशांत ढोरे, देहूरोड शहराध्यक्ष बाळासाहेब शेलार,कॅन्टोन्मेट उपाध्यक्ष  रघुवीर शेलार, लोणावळा शहर नगराध्यक्ष सुरेखा जाधव,लोणावळा शहराध्यक्ष रामविलास खंडेलवाल,श्रीधर पुजारी, जिल्हा परिषद सदस्य नितीन मराठे,गणेश धानिवले, माजी सभापती गुलाब म्हाळसकर,माजी उपसभापती शांताराम कदम, उपसभापती दत्तात्रय शेवाळे,युवा मोर्चा अध्यक्ष संदीप काकडे,अभिमन्यू शिंदे, नामदेव वारिंगे,अनंता कुडे,विकास लिंभोरे,सागर शिंदे, सुमित्रा जाधव, प्रदीप धामणकर, बाळासाहेब घोटकुले, संतोष कुंभार, बिंद्रा गणात्रा, अर्चना म्हाळसकर, सुभाष धामणकर, जितेंद्र बोत्रे, सुनील वरघडे, संदीप पवार, योगिता कोकरे, शोभा भेगडे, श्रेया रहाळकर, कल्याणी ठाकर, अनिता सावले, वैशाली घारे, ज्योती काटकर, मीनाक्षी तिकोणे, रजनी ठाकूर, वैदही रणदिवे, यांच्यासह तळेगाव, लोणावळा, देहूरोड, वडगाव येथील भाजपचे नगरसेवक व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

किरण राक्षे यांनी निषेध सभेचे सूत्रसंचालन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_DIR_MPU_III