Maval News : आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कोविड केअर सेंटरला फळे वाटप

एमपीसीन्यूज : मावळ तालुक्याचे आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने लोणावळा येथील कोविड केअर सेंटर व टाकवे येथील समुद्रा कोविड केअर सेंटर मध्ये कोरोना रुग्ण व वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टर, कर्मचारी यांना फळे वाटप करण्यात आली.

_MPC_DIR_MPU_II

यावेळी आमदार सुनिल शेळके युवा मंचचे सदस्य धनंजय काळोखे, अशोक ढाकोळ, दिपक मालपोटे, मयूर झोडगे, गणेश देशपांडे, अभिजीत मालपोटे, अक्षय काळे, राकेश साठे आदींसह कोविड केअर सेंटर मधील स्टाफ उपस्थित होते.

आमदार शेळके यांच्या वतीने ‘मदत नव्हे कर्तव्य’ उपक्रमांतर्गत मागील वर्षभरापासून विविध आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येत आहे. लोणावळा येथील कोविड केअर सेंटर मध्ये सुमारे 85  तर समुद्रा कोवीड केअर सेंटर मध्ये 190  पिशव्यांचे वाटप करण्यात आले. रविवारी तळेगाव दाभाडे मधील पणन महामंडळ येथील कोविड केअर सेंटर व इंदोरी येथील तोलानी कोविड केअर सेंटरमध्ये फळ वाटप करणार असल्याची माहिती युवा मंचचे सदस्य मयूर झोडगे यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.