Maval News: मावळ तालुका भाजपा कामगार आघाडी कार्याध्यक्षपदी दत्तात्रय गाडे

एमपीसी न्यूज – सुदुंबरे येथील दत्तात्रय बबन गाडे यांची मावळ तालुका भाजपा कामगार आघाडीचे कार्याध्यक्षपदी निवड करण्यात आली. तसे पत्र कामगार आघाडी अध्यक्ष अमोल भेगडे यांनी दिले. सदर निवडीचे पत्र तालुका भाजपा अध्यक्ष रवींद्र भेगडे व मावळचे उपसभापती दत्तात्रय शेवाळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.

याप्रसंगी उपाध्यक्ष किसन येवले व गणेश वाघवले, सरचिटणीस स्वप्नील भांगरे व प्रदीप मोढवे यांना ही निवड पत्रे प्रदान करण्यात आली. यावेळी रवींद्र भेगडे व शेवाळे यांनी अभिनंदन करुन सत्कार केला व कार्यकर्त्यांना आवाहन केले की शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री विमा योजना प्रत्येक गावात तळागाळापर्यंत पोहचविण्यासाठी कामाला लागावे.

यावेळी सरचिटणीस सुनील चव्हाण, किसान संघाचे अध्यक्ष सुभाष धामणकर, संत तुकाराम सहकारी साखर कारखाना संचालक शामराव राक्षे, माजी संचालक सुभाष बोडके, माजी सरपंच जालिंदर धामणकर,  तालुका भाजपा संघटनमंत्री किरण राक्षे, किसन केदारी, विद्यार्थी आघाडी अध्यक्ष अभिमन्यू शिंदे उपस्थित होते. प्रास्ताविक व स्वागत सरचिटणीस सुनील चव्हाण यांनी केले. सूत्रसंचालन गणेश धानिवले यांनी केले. आभार अमोल भेगडे यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.