Maval News : श्री पोटोबा महाराज मंदिरामध्ये विधिवत घटस्थापना

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज, जोगेश्वरी मंदिरामध्ये आदिशक्तीच्या नवरात्रोत्सवास सुरुवात झाली. मंदिरात गुरुवारी (दि.7) देवस्थानचे विश्वस्त सचिव अनंता कुडे व पुजारी सुरेश गुरव यांच्या हस्ते घटस्थापना करून या उत्सवाला सुरवात करण्यात आली.

यावेळी देवस्थानचे प्रमुख विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, उपाध्यक्ष गणेश ढोरे, किरण भिलारे, चंद्रकांत ढोरे, अॅड. अशोक ढमाले, अॅड.तुकाराम काटे, अरुण चव्हाण, तुकाराम ढोरे, सुभाषराव जाधव, पुजारी मधुकर गुरव व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोरोना महामारी आटोक्यात येत असताना, शासनाने दिलेल्या आदेशानुसार मंदिरे पुर्णवेळ उघडल्यामुळे भाविकांना जवळून दर्शन घेण्याचा लाभ मिळाला. राज्य सरकार व पोलिस प्रशासन यांनी घालून दिलेले आदेश व सूचनांचे पालन करत असताना मंदिर प्रवेशद्वाराजवळ सॅनिटाईझर स्टँडची व्यवस्था करण्यात आली होती.

श्री पोटोबा महाराज मंदिरामधील पुर्व परंपरा जपत असताना वडगांव व पंचक्रोशीतील गावांमधील भाविक भक्तगण मंदिर मध्ये धान्य घेण्यासाठी गर्दी करत असतात व ते धान्य घेऊनच आपापल्या गावात व घरातील घटस्थापना विधी करत असतात.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.