Maval News : तिकोना गडावरील तळजाई लेणीत घटस्थापना

0

एमपीसी न्यूज – दरवर्षी प्रमाणे यावर्षी देखील तिकोना गडावर नवरात्र उत्सव साजरा करण्यात येत आहे. आज (शनिवारी, दि. 17) गडावरील तळजाई लेणीत देवीच्या घटाची स्थापना करण्यात आली.

आज पासून शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला. घरोघरी देवीच्या घटांची स्थापना करण्यात आली आहे. घरोघरी संबळाच्या नादावर देवीची आरती केली जात आहे.

मावळ तालुक्यातील किल्ले तिकोना गडावर देखील नवरात्र उत्सव साजरा केला जातो. कोरोना साथीच्या सावटात देखील परंपरेला खंड न पडू देता गडप्रेमींनी गडावर घटस्थापना केली आहे.

तिकोना गडावरील गडदेवता माता तळजाई लेणीत देवी जवळ घटस्थापना करण्यात आली आहे. त्यानिमित्त गडावर लेणी जवळ झालर बांधुन लेणीला सजवण्यात आले आहे. रावरात्रीचा आरास गडप्रेमींकडून केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.