Maval News : वाढीव कला गुण देऊ नये, या शासन आदेशाची होळी

एमपीसी न्यूज – दि. 26 मार्च 2021 रोजी शासनाच्या शिक्षण विभागाने आदेश काढून चित्रकला ग्रेड परीक्षा यावर्षी रद्द करण्यात आल्या त्याच बरोबर ग्रेड परीक्षेचे वाढीव गुण ही मिळणार नाहीत असा तुघलकी निर्णय घेऊन शासनाने आदेश काढून लाखो विद्यार्थ्यावर अन्याय केला आहे. यामुळे विद्यार्थी व पालक वर्गात प्रचंड नाराजी पसरली आहे.

या आदेशाचा महाराष्ट्र राज्य कलाशिक्षक महासंघ शाखा पुणे जिल्हा कला शिक्षक संघाच्यावतीने निषेध केला असून या शासन आदेशाला विरोध करून त्याविरुद्ध आंदोलनाचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे उपाध्यक्ष करण सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली मावळ तालुका कला शिक्षक संघाच्या वतीने या शासन आदेशाची होळी करण्यात आली.

याप्रसंगी महाराष्ट्र राज्य कला शिक्षक महासंघाचे सहसचिव व पुणे जिल्हा कला शिक्षक संघाचे अध्यक्ष मिलिंद शेलार, मावळ तालुका शिक्षक संघाचे अध्यक्ष आतिश थोरात, उपाध्यक्ष विजय जाधव, अमोल जाधव, अंदुरे सर, इत्यादी पदाधिकारी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.