Maval News :  पंतप्रधान मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीस 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल शहरातील सर्व पत्रकार बंधूचा सन्मान

एमपीसी न्यूज – भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या यशस्वी कारकिर्दीस 7 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल वडगाव शहर भारतीय जनता पक्षाच्या वतीने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने शहरातील सर्व पत्रकार बंधूचा सन्मान करण्यात आला.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यशस्वीरित्या सात वर्षांचा कालावधी पुर्ण होत असताना वडगाव शहर भाजपचे वतीने मागील वर्षभराच्या काळामध्ये कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर कोरोना योद्धा म्हणून काम करणारे शहरातील सर्व पत्रकार बंधू यांना माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांचे हस्ते व पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे, तालुका भाजपचे प्रभारी भास्कर म्हाळसकर, तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे, युवक अध्यक्ष संदीप काकडे, माजी सभापती गुलाब म्हाळसकर, माजी उपसभापती शांताराम कदम, नगरसेवक अरुण भेगडे, व वडगांव शहर अध्यक्ष किरण भिलारे आदी मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

विजय सुराणा – दै. लोकमत
ज्ञानेश्वर वाघमारे – दै. सकाळ
गणेश विनोदे – दै.पुढारी
सुदेश गिरमे – दै. पुण्यनगरी
महादेव वाघमारे – दै. प्रभात
प्रभाकर तुमकर – एमपीसी न्यूज
दत्तात्रय म्हाळसकर – महाराष्ट्र लाईव्ह
सतीश गाडे – दै.नवराष्ट्र
संजय दंडेल – मावळ न्यूज

आदी पत्रकार बंधूंचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी माजी राज्यमंत्री संजय उर्फ बाळा भेगडे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सात वर्षीय भ्रष्टाचार मुक्त सरकारच्या विविध लोकोपयोगी कार्याची माहिती दिली. तसेच वडगाव शहर भाजपचे विशेष कौतुक केले व पत्रकारांनी केलेल्या मागणीला वडगाव शहर भाजपच्या नगरसदस्यांकडून नगरपंचायतीच्या होऊ घातलेल्या नूतन इमारतीमध्ये स्वतंत्र पत्रकार कक्ष उपलब्धतेसाठी विशेष मागणी करण्यात यावी अशी सूचना ही भेगडे यांनी केली.

तालुका भाजपा प्रभारी भास्कर म्हाळसकर यांनी पत्रकारांच्या कार्याचे कौतुक केले व वडगांव शहर भाजपच्या वतीने पुढील काळात देखील असे विविध समाजोपयोगी उपक्रम राबविण्यात येतील अशी ग्वाही दिली. तालुका अध्यक्ष रविंद्र भेगडे यांनी आपल्या मनोगतामध्ये वडगांव शहर भाजपने केलेल्या नाविन्यपूर्ण उपक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

वडगांव शहर भाजपचे कार्य हे लोकोपयोगी असून अनेक सामाजिक उपक्रम राबवून खऱ्या अर्थाने समाजाचे हित जपण्याचे काम करत आहे. असे गौरवोद्गार वडगाव मावळ ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष विजय सुराणा यांनी सत्काराला उत्तर देताना काढले.

याप्रसंगी तालुका प्रसिद्धी प्रमुख अनंता कुडे, सरचिटणीस सुनिल चव्हाण,दिव्यांग आघाडी अध्यक्ष विकास लिंभोरे, नगरसेवक प्रविण चव्हाण, किरण म्हाळसकर, प्रसाद पिंगळे, अ‍ॅड. विजय जाधव, माजी सरपंच नामदेव भसे, विकास शेलार, व्यापारी आघाडी मोर्चा भूषण मुथा, तालुका युवा मोर्चा उपाध्यक्ष रवींद्र काकडे, शंकर भोंडवे, शेखर वहिले, शरद मोरे, विनायक भेगडे, केदार भेगडे , प्रविण ढोरे आदी उपस्थित होते.

स्वागत शहराध्यक्ष किरण भिलारे यांनी केले, सूत्रसंचालन सरचिटणीस रविंद्र म्हाळसकर यांनी तर आभार प्रदर्शन युवा मोर्चा अध्यक्ष रमेश ढोरे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.