Maval News : कोंडेश्वर देवस्थान येथे बुधवारी भगवान शंकराची मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील असंख्य भाविकांचे श्रद्धास्थान असलेले जांभवली येथील भगवान शंकर मंदिरात ग्रामस्थांच्या पुढाकाराने व श्री पोटोबा देवस्थानचे मुख्य विश्वस्त सोपानराव म्हाळसकर, माजी सरपंच भगवान पवार, पोलीस पाटील दत्तात्रय लालगुडे यांच्या विशेष प्रयत्नातून आणि लोकवर्गणीतून भगवान शंकर मूर्ती प्रतिष्ठापना सोहळ्याचे लोकार्पण होणार आहे.

 

माजी आमदार दिगंबर भेगडे यांच्या हस्ते व खासदार श्रीरंग बारणे, आमदार सुनिल शेळके व माजी राज्यमंत्री संजय (बाळा) भेगडे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे.

 

कार्यक्रमाचे नियोजन कोंडेश्वर देवस्थान, श्री पोटोबा देवस्थान व अखिल भारतीय वारकरी मंडळ आणि सत्संग भजनी मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.

 

आयोजकांकडून भाविकांना या कार्यक्रमासाठी उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.