Maval Corona News : ‘कोरोना प्रतिबंधासाठी मावळात शनिवारी व रविवारी ‘जनता कर्फ्यू’ लावा’

मावळ तालुका शिवसेनेची तहसीलदारांकडे मागणी

एमपीसीन्यूज : गेल्या 15 दिवसांपासून मावळ तालुक्यातील प्रत्येक शहरात व ग्रामीण भागात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांना हॉस्पिटलमध्ये जागा मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मावळ तालुक्यात शनिवारी व रविवारी जनता कर्फू लावावा, अशी मागणी मावळ तालुका शिवसेनेच्या वतीने करण्यात आली आहे.

या संदर्भात शिवसेना मावळ तालुकाप्रमुख राजेश खांडभोर यांनी मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांना निवेदन दिले आहे.

_MPC_DIR_MPU_II

सामान्य परिवारातील व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाल्यास पैशांअभावी उपचारास अडचणी निर्माण होत आहेत. मावळमध्ये औद्योगीक विभाग व पर्यटकांच्या माध्यमातून बाहेरील नागरिकांचा वावर मोठ्या प्रमाणावर आहे. काही नागरिक विनाकारण बाहेर फिरताना सर्रास आढळून येत आहेत.

काही ठिकाणी नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. याला प्रतिबंध करण्यासाठी अत्यावश्यक सेवा वगळून येत्या शनिवार व रविवारी जनता कर्फ्यू लागू करणे गरजेचे आहे. जेणे करून मावळ मधील कोरोना हद्दपार होण्यास मदत होईल, असे खांडभोर यांनी निवेदनात म्हटले आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.