Pavana Dam News : मागील 24 तासात पवना धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला; पवना धरण 67.80 टक्के भरले

एमपीसी न्यूज – पवना धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला आहे. दररोज पडत असलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यात चांगली वाढ होत आहे. मागील 24 तासात धरण क्षेत्रात 65 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला आहे. यामुळे सध्या पवना धरण 67.80 टक्के भरले आहे.

31 जुलैपर्यंत धरणात 33.60 टक्के पाणीसाठा होता. त्यामुळे मावळातील शेतकरी आणि पिंपरी चिंचवडकर यांच्यामध्ये काहीसे निराशेचे वातावरण होते. ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीपासून पावसाने चांगला जोर धरला आणि शेतकरी व शहरवासीय यांच्या आशा पल्लवित झाल्या.

_MPC_DIR_MPU_II

1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 32.51 टक्के वाढला आहे.

गेल्या 24 तासात 65 मिलिमीटर पाऊस पडला. डोंगराळ भागातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येत आहे. त्यामुळे मागील 24 तासात पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 5.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज धरणात 67.80 टक्के पाणीसाठा आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.