Maval News : लसीकरण अभियान प्रभागनिहाय राबविण्याच्या मागणीसाठीचे उपोषण आश्वासनानंतर मागे

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहराचा विस्तार व वाढती स्थलांतरीत लोकसंख्या पाहता लसीकरणाची गती वाढविण्यासाठी लसीकरण अभियान, लसीची उपलब्धता करुन प्रभागनिहाय राबविण्यात यावे यासाठी तळेगाव दाभाडे भाजपचे शहराध्यक्ष रविंद्र माने यांनी येथील मावळ पंचायत समिती चौकात सोमवारी (दि.26) बेमुदत उपोषण सुरु केले होते. सायंकाळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जयेश बिरारी व गुणेश बागडे यांनी आश्वासन दिल्याने आंदोलन मागे घेण्यात आले.

त्यावेळी भाजपा जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे व तळेगाव नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष सुशील सैंदाणे, जिल्हा भाजप सरचिटणीस अविनाश बवरे उपस्थित होते.

प्रभागनिहाय लसीकरण राबविण्यासाठी माने यांनी दि 16 जुलै रोजी मावळचे तहसिलदार मधुसुदन बर्गे यांना लेखी निवेदन दिले होते परंतु त्यावर कार्यवाही न झाल्याने आजपासून माने यांनी उपोषण सुरु केले होते.

निवेदनात म्हटले आहे की कोरोना महामारीतुन सावरण्यासाठी लसीकरण अभियान हाच एकमेव प्रभावी उपाय आहे म्हणुन अधिकाधिक लसीकरण होवुन भयमुक्त वातावरण होण्यासाठी लसीकरणाचे कोंबीग ऑपरेशन होणे गरजेचे झाले आहे. प्रभागानिहाय लसीकरण राबविले तर वयस्कर नागरिक व इतर सर्वाना अतिशय सोयीचे होईल व डॉक्टर व नर्सिंग स्टाफ यांना या अभियानाचे नियोजन करणे सोपे होईल.

या उपोषणाला माजी मंत्री बाळा भेगडे, भाजपचे तालुका प्रभारी भास्कर आप्पा म्हाळसकर, सभापती ज्योती शिंदे, माजी सभापती गुलाबराव म्हाळसकर, माजी सभापती निकिता घोटकुले, माजी उपसभापती शांताराम कदम, प्रंशात ढोरे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, ज्योती जाधव, रजनी ठाकुर, यदुनाथ चोरघे, शोभा भेगडे, एकनाथ टिळे, प्रदीप गटे, कैलास पानसरे, धनंजय टिळे, अक्षय भेगडे, आशुतोष हेंद्रे,बाळासाहेब शेलार,सागर भेगडे, नितीन पोटे, रविंद्र साबळे, निर्मल ओसवाल, सागर शर्मा आदीनी भेटुन पाठींबा दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.