Maval News : युवा सेना, युवती सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी कार्ला येथे मुलाखती

एमपीसीन्यूज : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तयारीसाठी तरुणांना जोडण्याचे प्रयत्न शिवसेनेकडून सुरू करण्यात आले आहेत. याचाच एक भाग म्हणून मावळ विधानसभा मतदारसंघातील युवा सेना, युवती सेना पदाधिकारी निवडीसाठी रविवारी ( दि. 21 ) कार्ला ( ता. मावळ) येथे मुलाखती घेण्यात येणार आहेत.

कार्ला येथील एमटीडीसी येथे सायंकाळी 5. 30 ते सायंकाळी 7  या वेळेत या मुलाखती होतील. युवा सेना सचिव दुर्गा शिंदे , युवासेना उपसचिव निलेश महाले व युवासेना विस्तारक व मावळ लोकसभा संपर्क प्रमुख राजेश पळसकर इच्छुकांच्या मुलाखती घेणार आहेत.

या विषयी अधिक महिती देताना मावळ युवा सेना अधिकारी पै. अनिकेत घुले म्हणाले, युवा सेना आणि युवती सेनेच्या कार्यकारिणीसाठी चांगली प्रतिमा असलेल्या तरुण आणि तरुणींची निवड करण्यात येणार आहे. या माध्यमातून मावळ विधानसभा आणि मावळ लोकसभा मतदासरसंघात शिवसेनेची ताकद दुपटीने वाढविण्यात येणार आहे.

मावळातील तरुणांना शिवसेनेसोबत जोडण्यासह त्यांचे प्रश्न प्रखरतेने मांडण्याचे प्रयत्न युवा सेनेकडून होणार आहेत. यात बेरोजगारी आणि शिक्षणावर भर राहणार आहे. राज्याचे पर्यटनमंत्री व युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी मावळात युवा सेनेची संघटनात्मक ताकद उभी करणार आहे. युवा सेनेने तरुणांच्या प्रश्नावर आक्रमक भूमिका घेताना शिवसेनेलाही बळ द्यावे, यासाठी जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याचे पै. अनिकेत घुले यांनी संगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.