Maval News: आंद्रा धरणाचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते जलपूजन

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील धरण परिसरात झालेल्या संततधार पावसामुळे आंद्रा धरण शंभर टक्के भरले आहे. ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात 100% भरलेले तालुक्यातील पहिले धरण आहे.

आंदर मावळ, तळेगाव एमआयडीसीला पाणीपुरवठा करणाऱ्या आंद्रा धरणाचा जलपूजन समारंभ मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या हस्ते व इतर मान्यवरांच्या उपस्थितीत आज (मंगळवार) पार पडला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष बबनराव भेगडे, जिल्हा परिषद सदस्या शोभाताई कदम, चेअरमन अंकुश आंबेकर, ग्रामीण ब्लॉक अध्यक्ष सुभाष जाधव, माजी सरपंच शिवाजी पवार, पोलीस पाटील बबन पवार, उपसरपंच सुरेखाताई नखाते, सुदाम कदम, मंगेशकाका ढोरे, राघोजी तळपे, मोहन घोलप, गोविंदा आंभोरे, दत्तात्रय वायकर, विशाल पडवळ, चंद्रकांत घोलप, नवनाथ पडवळ, माणिक तांबोळी, अनिल जाधव, विक्रम कलावडे, गोविंद तांबोळी, गुरुदेव घोलप, सुवर्णा घोलप, तसेच स्थानिक ग्रामस्थ व इतर मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाचे नियोजन राष्ट्रवादी काँग्रेसपक्षाच्या वतीने करण्यात आले होते. सूत्रसंचालन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस सुदाम कदम यांनी केले तर आभार माणिक तांबोळी यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.