Maval News : वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी जयश्री काटकर

एमपीसी न्यूज – वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदी जयश्री काटकर यांची नियुक्ती करण्यात आली. सुवर्णा ओगले यांची विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती झाली. वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारी पदाच्या रिक्त जागेवर पुणे महापालिका येथील सहाय्यक आयुक्त जयश्री काटकर यांची नियुक्ती करण्यात आली. त्यांनी त्यांच्या पदाचा कार्यभार स्वीकारला.

सुवर्णा ओगले यांची विभागीय आयुक्त कार्यालय पुणे येथे सहाय्यक आयुक्त या पदावर नियुक्ती झाली. वडगाव नगरपंचायतीच्या मुख्याधिकारीपदाच्या रिक्त जागेवर पुणे महानगरपालिका येथील सहाय्यक आयुक्त जयश्री काटकर यांची नियुक्ती झाली.

त्यांच्या नियुक्ती बद्दल नगराध्यक्ष मयूर ढोरे, उपनगराध्यक्ष पूजा वहिले,नगरसेवक राहुल ढोरे, चंद्रजीत वाघमारे, माया चव्हाण, पुनम जाधव, कार्यालय अधिक्षक सोमनाथ आगळे, अभियंता अनिल कुंभार, आस्थापना विभाग प्रमुख युवराज विरणक व कर्मचाऱ्यांनी भव्य सत्कार केला.

सत्कार प्रसंगी जयश्री काटकर म्हणाल्या वडगाव नगरपंचायतीच्या हद्दीतील नागरिकांना पायाभूत सुविधा देण्यासाठी अग्रेसर राहणार. शहराला विकासाचे मॉडेल बनविण्यासाठी सक्रिय राहाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

-MPC-BOTTOM-BANNER-I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.