Maval News : कैलास गायकवाड यांनी सामाजिक उपक्रम राबवून साजरा केला वाढदिवस

एमपीसी न्यूज – मावळ राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम राबविले. त्यामध्ये त्यांनी नाणे मावळ, आंदर मावळ परिसरातील आदिवासी, कातकरी गरजू लोकांना आवश्यक साहित्य वाटप केले.

कामशेत येथे रक्तदान शिबीर आयोजित केले. नाणे मावळ आणि आंदर मावळ भागात वृक्षारोपण केले.  युवा पर्व फाऊंडेशन मावळ तालुका यांच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कांब्रे (नाणे मावळ) येथील युवा नेते, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे युवक अध्यक्ष कैलास गायकवाड यांनी वाढदिवसानिमित्त सामाजिक उपक्रम राबवत मावळ तालुक्यांतील नाणे मावळ येथील उंबरवाडी व आंदरमावळातील सटवाईवाडी या दोन्ही गावातील गरजू व आदिवासी लोकांना ब्लँकेट वाटप, शाळेतील मुला-मुलींना कपडे, वह्या-पुस्तक, पेन, मास्क, औषधे व आर्सेनिक गोळ्या वाटप, फळे व खाऊ वाटप करण्यात आले.

कामशेत येथील सिद्धीविनायक हाॅस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर आयोजित केले होते. शिबिरात 65 लोकांनी रक्तदान केले. मावळातील उंबरवाडी, कांब्रे, सटवाईवाडी येथे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे संघटनमंत्री नारायण ठाकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक शांताराम लष्करीसह तरूण कार्यकर्ते, ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.