Maval News : कान्हे रेल्वे फाटक दुरुस्तीच्या कामासाठी 4, 5 नोव्हेंबरला बंद

एमपीसी न्यूज – रेल्वेच्या दुरुस्ती कामासाठी कान्हे रेल्वे फाटक बुधवार (दि. 4) आणि गुरुवार (दि. 5) हे दोन दिवस बंद राहणार आहे.

रेल्वे विभागाकडून पुणे-लोणावळा रेल्वे मार्गावर दुरुस्तीची कामे केली जात आहेत. या दुरुस्तीच्या कामासाठी कान्हे रेल्वे स्थानकाजवळ असलेले कान्हे गेट क्रमांक 45 हे बुधवारी सकाळी आठ वाजल्यापासून ते गुरुवारी सायंकाळी सहा वाजेपर्यंत या कालावधीत बंद राहणार आहे.

दरम्यानच्या कालावधीत प्रवासाठी नागरिकांनी जवळच असलेल्या जांभूळ गेटचा वापर करावा. तो रस्ता नागरिकांसाठी उपलब्ध आहे, अशी माहिती रेल्वे विभागाकडून देण्यात आली आहे.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.