Bal Warkari : बालवारकरी घेताहेत प्रशिक्षण कार्यशाळेत संस्कारांचे धडे

एमपीसी न्यूज – श्री विठ्ठल परिवार मावळ यांच्यातर्फे आयोजित करण्यात आलेल्या बाल वारकरी (Bal Warkari) प्रशिक्षण कार्यशाळेत बालवारकरी संस्कारांचे धडे घेत आहेत. 10 ते 18 मे या कालावधीत ही कार्यशाळा वडीवळे येथील संगमेश्वर मंदिर येथे होत आहे.

 

श्री विठ्ठल परिवार मावळचे संस्थापक आमदार सुनील शेळके आहेत. संचालक ह.भ.प. दिलीप महाराज खेंगरे आणि ह.भ.प. किसन महाराज केदारी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उद्योजक सुधाकर शेळके यांच्या संकल्पनेतून मंगळवार (दि. 10) ते मंगळवार (दि. 18) पर्यंत बालवारकरी (Bal Warkari) प्रशिक्षण कार्यशाळा होत आहे.

 

Rakshak Matrubumiche : सेना दलात प्रवेश म्हणजे ‘सुरक्षित’ भविष्याची खात्री आणि देशसेवेची संधी – ब्रिगेडियर हेमंत महाजन

या कार्यशाळेचे उद्घाटन पंडित किरण परळीकर, मावळ तालुका दिंडी समाज कार्याध्यक्ष नारायण ठाकर, लक्ष्मण सातकर, गोविंद थोरवे, चेतन थोरवे, तानाजी जांभूळकर, नवनाथ थोरवे, आरती थोरवे आणि वडीवळे ग्रामस्थ यांच्या हस्ते झाले.

 

 

एकादशीच्या दिवशी गुरुवारी (दि. 12) सकाळी प्रसिद्ध योग प्रशिक्षक संतोष जांभूळकर यांच्या मार्गदर्शनातून योग व व्यायाम प्रात्यक्षिके झाली. सकाळी ह.भ.प. दत्ता महाराज हजारे व दुपारी ह.भ.प. गोपीचंद महाराज कचरे यांचे विचार सत्र झाले. सायंकाळी साधक विद्यार्थी यांचा हरिपाठ ह.भ.प. भिमाजी महाराज भानुसघरे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला. त्यानंतर ह.भ.प. गणेश महाराज जांभळे यांचे कीर्तन झाले.

 

 

मावळ तालुक्यातील अनेक लोक या कार्यशाळेस भेट देत आहेत. अशा संस्कारमूल्य शिकवणाऱ्या कार्यशाळेची  गरज आहे, असे मत सर्वजण व्यक्त करीत आहेत. संस्कारक्षम पिढी घडवणाऱ्या या कार्यशाळेचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.