Maval News : तालुक्यातील सरपंच पदासाठीची आरक्षण सोडत 29 जानेवारीला होणार

एमपीसी न्यूज – मावळ तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीच्या दि. 5 मार्च 2020 ते दि. 4 मार्च2025 मधील सरपंच पदाची आरक्षण सोडत शुक्रवारी (दि. 29) सकाळी 11:30 वा. भेगडे लॉन्स कार्यालयात होणार असल्याची माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे, नायब तहसीलदार रावसाहेब चाटे, निवडणूक नायब तहसीलदार संतोष सोनवणे यांनी दिली.

यापूर्वी आरक्षण सोडत जाहीर केली होती. आता ती रद्द केली पुन्हा आरक्षण सोडत होत असल्याने काही बदल होणार की, आहेत तेच राहणार ही उत्सुकता निवडून आलेल्या सदस्यांमध्ये आहे. मावळ तालुक्यातील सोमाटणे, उर्से, कामशेत, टाकवे बुद्रुक, आंबी, नवलाख उंब्रे आदी ग्रामपंचायत हद्दीत मोठ्या प्रमाणावर उत्सुकता दिसत आहेत. मावळ तालुक्यातील 5 मार्च 2020 ते 4 मार्च 2025 या कालावधीमधील ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाच्या आरक्षण सोडतीचे जिल्हाधिकारी पुणे यांच्या वतीने तहसिलदार यांना प्राधिकृत करण्यात आलेले आहे.

जिल्हाधिकारी यांचे संदर्भीय आदेशामध्ये नमूद केलेनुसार मावळ उपविभागीय अधिकारी संदेश शिर्के यांचे नियंत्रणाखाली मावळ तालुक्यातील एकूण 103 ग्रामपंचायतींकरिता सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत करण्यात येणार आहे.

या सोडतीस आपण वेळेवर उपस्थित रहावे. कोविड-19 चा प्रादुर्भाव लक्षात घेता सोडतीस उपस्थित राहताना शासनाने व आरोग्य विभागाने वेळोवेळी दिलेल्या नियमांचे पालन करण्याची दक्षता घ्यावी.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.