गुरूवार, डिसेंबर 8, 2022

Maval News : हातभट्टी दारू तयार करण्याचा अड्डा आरटीआय कार्यकर्त्याने आणला उघडकीस

एमपपीसी न्यूज : पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या तळेगाव-दाभाडे पोलिसांच्या (Maval News) अखत्यारीतील गहुंजे गावाजवळील अवैध हातभट्टी तयार करण्याचा अड्डा माहिती अधिकार कार्यकर्ते श्रीजित रमेशन यांनी उघडकीस आणला आहे.

श्रीजित रमेशन म्हणाले, काही साथीदारांसह आम्ही नुकतेच देहूरोड परिसरात देशी दारूची अनेक अवैध विक्री उघडकीस आणली होती.(Maval News) मावळ मतदारसंघाचे आमदार सुनील शेळके यांनीही अशा बेकायदेशीर कामांना विरोध केला; मात्र संबंधित पोलीस अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

Bhosari crime : जमिन खरेदी केली म्हणून शिवीगाळ करत मारहाण

गहुंजे गावाजवळील अवैध हातभट्टीचा उड्डा उघडकीस आणल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर तळेगाव पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी धाव घेत (Maval News) हातभट्टी बनवण्यासाठी वापरलेले रसायन नष्ट केले. हे सर्वात मोठे हातभट्टी बनवण्याचे आणि पुरवण्याचे ठिकाण असून तेथून संपूर्ण मावळ भागात मोठ्या प्रमाणात पुरवठा केला जात होता असा आरोपही रमेशन यांनी केला.

 

Latest news
Related news